Download App

Navra Maja Navsacha 2: ‘या’ कारणासाठी स्वप्नील आणि सचिन पिळगांवकर निघाले कोकणात

Navra Maja Navsacha 2: अभिनयाच्या विश्वात चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi). मराठमोळा अभिनेता स्वप्नील 2024 वर्षात जोरदार कामात व्यस्त असताना त्याचा आजच्या सोशल मीडिया (Social media) पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता ही नव्या चित्रपटाची हिंट आहे की, स्वप्नील फक्त आपली ट्रीप एन्जॉय करतोय हे अजूनही कोड्यात आहे.

स्वप्नीलने नुकतच त्याच्या दोन चित्रपटाची घोषणा केली असून आता स्वप्नील आगामी काळात नेमकं काय करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. निर्मिती विश्वात पदार्पण करून स्वप्नील पुन्हा अभिनयात स्वतःची चमक दाखवतोय यात शंका नाही. स्वप्नीलने दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांच्या सोबतचा “कोकण सफर” चा फोटो सोशल मीडियाच्या स्टोरी मधून शेअर केला आहे. आता हे नक्की “नवरा माझा नवसाचा 2 च शूटिंग आहे” की अजून काही नवा प्रोजेक्ट असणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

स्वप्नीलने नुकतच त्याच्या निर्मिती विश्वात पदार्पण करून “नाच गं घुमा” या चित्रपटाच पोस्टर लाँच केलं असून प्रेक्षकांना त्यांच्या या चित्रपटाची उत्सुकता तर आहेच सोबतीला “बाई गं” या चित्रपटातून स्वप्नील अनोखी भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. 2024 स्वप्नीलसाठी सिनेमॅटिक ठरणार यात शंका नाही. पण स्वप्नीलच्या सोशल मीडिया पोस्ट मधून त्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आणि आता तो नक्की कोणत्या प्रोजेक्ट साठी काम करतोय हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Mirza Song : अजय देवगण-प्रियामणीच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने, पाहा नवं गाणं…

गेल्या काही दिवसापूर्वी चित्रपटाच्या नव्या भागातही ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशा मराठी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शुभारंभ करण्यासाठी निमति- दिग्दर्शक, प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी गणपतीपुळे येथे भेट दिली. चित्रपटाची स्क्रिप्ट पिळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणपतीचरणी ठेवली. यावेळी रत्नागिरीतील व्यावसायिक सचिन देसाई हेही उपस्थित होते. मार्च महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण रत्नागिरीमध्येच सुरू होणार आहे.

follow us