Swapnil Joshi Visit Ambabai Temple: परेश मोकाशी (Paresh Mokashi) दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ मराठी (Nach Ga Ghuma ) सिनेमा येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशी, (Swapnil Joshi) मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) महिला दिनाच्या निमित्ताने सिनेमाचा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला होता. ज्यामध्ये मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव एका वेगळ्या रुपात बघायला मिळणार आहे.
अभिनेता सध्या निर्मात्याच्या मुख्य भूमिकेत असून आगामी “नाच गं घुमा” सिनेमाच जोरदार प्रमोशन सुद्धा होतंय. स्वप्नील प्रमोशनसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्याने कोल्हापूरच्या अंबाबाईच दर्शन घेतलं. प्रमोशन आणि चित्रपटाची जोरदार चर्चा असताना स्वप्नीलने महालक्ष्मीला जाऊन देवीच मनोभावे दर्शन केलं आणि चित्रपटासाठी खूप शुभेच्छा मागितल्या आहेत. स्वप्नील निर्मात्याची भूमिका साकारत असताना लवकरच त्याचे दोन अफलातून चित्रपट देखील येणार आहे. “बाई गं” आणि “जिलबी” या दोन हटके कलाकृती घेऊन तो लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
‘नाच गं घुमा’ या चित्रपटाद्वारे अभिनेता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवला आहे. स्वप्नीलसह शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी देखील या सिनेमाच्या निर्मिती केली आहे. याआधी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत स्वप्नीलने लिहिलं आहे की, “स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागते. ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे, मालकीण-मोलकरणीचे सूर जुळले की गृहिणीची होते, महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी. या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून कायम तटस्थ उभ्या राहतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेऊन येत आहोत…‘नाच गं घुमा’”
बिग बीं शेअर केला ‘अश्वत्थामा’चा दमदार लूक; सोशल मीडियावर ‘कल्की 2898 एडी’ची चर्चा
पुढे अभिनेता स्वप्नील म्हणाला की, “नुकतंच सिनेमाच चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. उत्तम कथानक , उत्कृष्ट संगीत आणि सिनेमाची संपूर्ण टीम या सगळ्यांचा मेळ जुळून येऊन ‘नाच गं घुमा’ घडतोय याचा फारच आनंद होत आहे. चांगल्या गोष्टींचा भाग होण्याचा अभिमान सतत असतो आणि यावेळी अनोख्या भूमिकेत असल्याने हा अभिमान आणखीनच वाढला आहे. कारण चांगल्या कलाकृतीचा भाग असणं आणि आपल्या हातून चांगली कलाकृती एक निर्माता म्हणून घडणं ही खूप कमालीची बाब आहे. एक उत्तम माणूस घडताना आज माझ्या आयुष्यात स्त्री वर्गाचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून ‘नाच गं घुमा’ सारखा चित्रपट माझ्याहातून घडणं हा निव्वळ योगायोग असल्याचं यावेळी म्हटले आहे.