Swatantra Veer Savarkar Biopic Trailer Release: स्वातंत्र्य सेनानी आणि देशाचे प्रसिद्ध क्रांतिकारक वीर सावरकर (Swatantra Veer Savarkar Movie) यांच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. या चित्रपटाच्या टीझरचेही चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.
ट्रेलर लाँचच्या प्रसंगी रणदीप हुड्डाला (Randeep Hooda) या चित्रपटाबद्दलच्या त्याच्या दृष्टिकोनाबद्दल विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना तो म्हणाला की, “सर्वप्रथम म्हणजे या चित्रपटातून मला स्वतःची फसवणूक करायची नाही. मी असा कोणताही चित्रपट करत नाही. मी चित्रपट नाकारतो. पण जर मी एखाद्या चित्रपटाशी जोडलो गेलो तर मी माझे पात्र आत्मीयतेने स्वीकारतो. मला ते पात्र चांगले समजते. आणि हे काम एका दिवसात होत नाही. “तुमच्या कामावर प्रेम करणे हे देवावर प्रेम करण्यासारखे आहे.
ट्रेलरची सुरुवात वीर सावरकरांच्या आवाजाने होते. ते म्हणतात की, “भारताला अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले हे आपण सर्वांनी वाचले आहे. ही ती कथा नाही.” पुढे दोन इंग्रज बोलत आहेत आणि ज्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत ते धोकादायक असल्याचे वर्णन केले जात आहे. त्यानंतर वीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुडाची धमाकेदार एन्ट्री होते.
Tejswini Pandit : मराठी सिनेसृष्टीच्या परिवर्तनासाठी तेजस्विनी सज्ज; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
ट्रेलरमध्ये पुढे रणदीप हुड्डा 1857 च्या क्रांतीचे उदाहरण देऊन लोकांना अखंड भारत निर्माण करण्यास सांगत आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील आहे. तिची देखील झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळाली आहे. ती वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
हा ट्रेलर वीर सावरकरांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, लोकांना प्रेरणा देणारा आणि तुरुंगात जाण्याची कथा सांगणार आहे. या ट्रेलरमध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्या पात्रांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, सध्या फक्त या झलक दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट 22मार्चला प्रदर्शित होणार आहे.