T20 World Cup winner Tilak Verma visits the sets of ‘Peddi’ : 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणून ‘पेड्डी’ समोर येत आहे. ग्लोबल स्टार राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात जान्हवी कपूर आणि जग्गपती बापू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या वाढत्या उत्सुकतेदरम्यान T20 वर्ल्ड कप विजेता टीलक वर्मा यांनी ‘पेड्डी’च्या सेटला भेट दिली.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिलक वर्मा यांच्या भेटीची झलक दाखवली. सेटवर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी राम चरण यांनी त्यांना स्वतः साइन केलेला क्रिकेट बॅट भेट दिला. संपूर्ण टीमतर्फे राम चरण यांनी तिलक यांचे आभार मानले, तर तिलक यांनीही सेटला भेट देताना आपला आनंद व्यक्त केला. पोस्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, तिलक वर्मा यांनी चित्रपटातील स्पोर्ट्स सीक्वेन्स पाहिले आणि ते पाहून ते खूप प्रभावित झाले.
‘पेड्डी’चा पहिला गाणे ‘चिकरी चिकरी’ रिलीज होताच प्रचंड लोकप्रिय झाले. A. R. Rahman यांच्या संगीताची खास छाप असलेले हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, विविध प्लॅटफॉर्मवर 200 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. यानंतर दुसरे गाणे ‘रा रा रा ’ रिलीज करण्यात आले, जे एक दमदार आणि एनर्जेटिक ट्रॅक आहे. या गाण्यालाही यूट्यूबवर 47 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
Buchi Babu Sana लिखित व दिग्दर्शित ‘पेड्डी’मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय शिव कुमार , Divyendu Sharma आणि Jagapathi Babu यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वृिद्धी सिनेमाजच्या बॅनरखाली Venkata Satish Kilaru निर्मित आणि Mythri Movie Makers यांच्या सहकार्याने तयार होणारा हा चित्रपट 30 एप्रिल 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
