Tarak Mehta: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)ला ओळखले जाते. सध्या हा कार्यक्रम अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. या सीरियमध्ये मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने (Actress Jennifer Mistry Bansiwal) सिरियलच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर आता या सीरियलमध्ये ‘बावरी’ (Bawri) हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरियाने (Monica Bhadauria) शोचे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्याविरोधामध्ये पुन्हा आवाज उठवला आहे. गेल्या काही दिवसांखाली एका मुलाखतीच्या दरम्यान मोनिकाने सेटवर दिल्या जाणाऱ्या त्रासाचा खुलासा केला आहे. मोनिका म्हणाली की, “मला अनेक कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला असल्याचा खुलासा तिने यावेळी केला आहे.
मी खूप कमी कालावधीमध्ये माझी आई आणि आजी या दोघींना गमावले आहे. ते दोघे माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ होते. त्यांनी मला खूप प्रेमाने वाढवले होते. या दु:खातून ती कधीच बाहेर पडू शकली नाही. हा मोठा धक्का अनुभवल्यावर मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटत होते. तसेच मोनिका पुढे म्हणाली की, “त्या काळात मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी काम करत होते.
मात्र तिथेही माझा मानसिक छळ करण्यात आला. घरची बिकट अवस्था आणि त्यात शोमध्ये होणार्या छळामुळे मी मानसिकरीत्या कोसळत जात होते. या गोष्टीमुळे मला आत्महत्या करावीशी वाटत होती.” असा खळबळजनक खुलासा मोनिकाने केला आहे. मोनिकाअगोदर ‘तारक मेहता…’मधील अनेक कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफर मिस्त्रीने सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.