Yeh Kaali Kaali Aankhen : नेटफ्लिक्सची सुपरहिट थ्रिलर ‘ये काली काली आंखें’ (Yeh Kaali Kaali Aankhen) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 22 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या सीझनच्या थरारक प्रीमियरनंतर अवघ्या तीन आठवड्यांत या सिरीजच्या तिसऱ्या सीझनसाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे, ज्यामुळे जगभरातील चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
डार्क ट्विस्ट्स, सायकोलॉजिकल खोली आणि थरारक लव ट्राइंगलसाठी ओळखला जाणारा हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत आहे. दुसऱ्या सीझनने नेटफ्लिक्स (Netflix) इंडिया टॉप 10 मध्ये #1 वर सुरुवात केली आणि पहिल्या सीझनबद्दल पुन्हा रस निर्माण केला, ज्यामुळे शोच्या मोठ्या आकर्षणाची आणि समीक्षकांच्या प्रशंसेची खात्री पटते.
अवघ्या सहा भागांची प्रभावी स्टोरी, आंतरराष्ट्रीय कटकारस्थान आणि सखोल पात्रांच्या कंगोऱ्यांनी याला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मुख्य अभिनेता ताहिर राज भसीन, (Tahir Raj Bhasin) जो शोमध्ये विक्रांत सिंह चौहानची भूमिका साकारली, त्याने आपला आनंद व्यक्त केला, “मला खूप आनंद आहे की ‘ये काली काली आंखें’ ला तिसऱ्या सीझनसाठी मंजुरी मिळाली आहे आणि माझ्या पात्राला तसेच शोला मिळालेल्या प्रशंसेमुळे मी आभारी आहे.
पहिला सीझन आपल्या पाल्प एंटरटेनमेंटने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला, तर दुसऱ्या सीझन ने ‘सीझन 2 चा शाप’ मोडीत काढत मोठे यश मिळवले आहे. त्याच्या जबरदस्त ट्विस्ट्स आणि थरारक नाट्यामुळे प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. ”
ताहिरने आपल्या भूमिकेचे आव्हान आणि अनुभवावर सांगितले, “हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आहे. तिसऱ्या सीझनसाठी ग्रीन सिग्नल मिळणे म्हणजे आपण केलेल्या परिश्रमांना मान्यता मिळणे आहे. विक्रांतला पुन्हा साकारणे रोमांचक आणि समाधानकारक ठरले, आणि मी पुढील अध्याय अधिक ट्विस्ट्स आणि तीव्रतेसह मांडण्यासाठी उत्सुक आहे. समीक्षकांची प्रशंसा आणि चाहत्यांचा पाठिंबा आम्हाला प्रत्येक वेळी अधिक चांगले करण्यासाठी प्रेरित करतो.”
शोचे निर्माता सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी त्याच्या गतीशील घटनाक्रम आणि अप्रत्याशित वळणांना उत्कृष्टरीत्या हाताळले आहे, ज्यामध्ये उच्च स्तरावरील नाट्य आणि गुंतागुंतीच्या प्रेमकथेचा समतोल साधला आहे.
दिल्लीतही लाडकी बहीण योजना, दरमहा खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे, केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक
सीझन 2 च्या क्लिफहॅंगर—विक्रांत जखमी आणि पूर्वा गर्भवती—मुळे तिसऱ्या सीझनमध्ये अधिक गडद आणि थरारक कथा उलगडली जाणार आहे. आंचल सिंग, श्वेता त्रिपाठी आणि इतर कलाकारांचा दमदार अभिनय, शोचा अॅक्शन आणि रोमांसचा अनोखा समतोल, यामुळे ‘ये काली काली आंखें’ रोमँटिक थ्रिलर प्रकाराला नवे परिमाण देत आहे. चाहत्यांना खात्री आहे की सर्वात उत्तम अद्याप येणे बाकी आहे.