Urfi Javed: बॉयफ्रेंडबद्दल बोलताना उर्फी जावेदचा ‘तो’ Video Viral

Urfi Javed: ‘बिग बॉस’ (Big Boss) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असते. उर्फीची हटके स्टाइल आणि अतरंगी कपड्याने तिला अनेकवेळा ट्रोलिंगचा (Trolling) मोठा सामना करावा लागत असतो. उर्फी सतत मीडियासोबत कायम स्पष्ट (Video Viral) आणि उघडपणे बोलत असते. नुकत्याच एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T155027.012

Urfi Javed

Urfi Javed: ‘बिग बॉस’ (Big Boss) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असते. उर्फीची हटके स्टाइल आणि अतरंगी कपड्याने तिला अनेकवेळा ट्रोलिंगचा (Trolling) मोठा सामना करावा लागत असतो. उर्फी सतत मीडियासोबत कायम स्पष्ट (Video Viral) आणि उघडपणे बोलत असते. नुकत्याच एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे.


उर्फीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर (X boyfriend) जोरदार टीका करत त्याला शिवीगाळ केल्याचा ‘तो’ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. तिने दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान उर्फीला तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबाबत (Relationship) सवाल करण्यात आला. यावर उर्फी म्हणाली, ‘एक्स बॉयफ्रेंडने असे काही अनुभव दिले आहेत की, मी आता कोणासोबत देखील रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करणार नाही.

या मुलाने कसे फसवले याविषयी तिने मोठा खुलासा करताना तिने सांगितले आहे की, मी त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु त्या मुलाने तिच्या वाढदिवसाच्या तारखेचा टॅटू काढतो असे सांगून तिला फसवले आहे. त्याच्या वडिलांच्या आणि माझ्या वाढदिवसाची तारीख एकच होती. हा वडिलांसाठी काढलेला टॅटू आहे, असे त्याने सर्वांना सांगितले होते.


अगोदर मी अशी वेडी होती, पण आता माझ्याकडे पैसे असल्याने मला कोणाचीही गरज नाही. एक्स बॉयफ्रेंड अशाप्रकारे फसवत असल्याचे कळल्यावर उर्फीने त्याच्या नावाचा टॅटू कव्हरअप केल्याचे सांगितले आहे. पुढे ती म्हणाली, ‘टॅटू का कव्हर केलास म्हणून उलट एक्स बॉयफ्रेंडने मलाच जाब विचारला. त्यावेळी मी त्याला त्यावरून चांगलेच सुनावले असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

तुला हे रिलेशनशिप मान्य करायचे नाही मग मीच का सिंदूर आणि मंगळसूत्र घालून फिरायचं का? तसेच या गोष्टीवरुन तिची आईदेखील ‘जा आता आणखी काही टॅटू काढ’ असे बोलून आजही तिची त्या गोष्टीवरून चेष्टा उडवत असल्याचे उर्फीने मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. या मुलाखतीच्या दरम्यान उर्फीने सर्व सवालांना बिनधास्तपणे सडेतोड उत्तरे दिली आहे.

Exit mobile version