Download App

Tanvi The Great च्या दिग्दर्शकासाठी अनुपम खेर यांची खास पोस्ट; म्हणाले तो सर्वात कठोर पण…

Tanvi The Great अनुपम खेर त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शक सुनील रॉड्रिग्ज यांचा फोटो शेअर केला आहे.

Tanvi The Great film Director Introduced by Anupam Kher : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ( Anupam Kher ) त्यांच्या आगामी चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. तन्वी द ग्रेट ( Tanvi The Great ) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या शूटिंग मधील काही फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत असतात. असाच फोटो यावेळी देखील खेळणी शेअर केला त्यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक ( film Director ) सुनील रॉड्रिग्ज यांचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला सुनीलबद्दल अत्यंत अभिमान वाटत असल्याचं सांगितलं आहे.

या पोस्टमध्ये खेर म्हणाले की, माझा आगामी चित्रपट तन्वी द ग्रेट या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील रॉड्रिग्ज यांची ओळख करून देताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच अभिमान वाटत आहे. रॉड हा एक लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्याला दिग्दर्शनातील सर्वात गतिमान, प्रयोगशील आणि जादूई अविष्कार करणारा दिग्दर्शक मानले जाते.

Government Schemes : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आहे तरी काय?

तन्वी द ग्रेट या चित्रपटाच्या निमित्ताने रॉडला अनुभवन्याचा प्रसंग आला. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो जबरदस्त दिसत असला तरी देखील तो सेटवरील सर्वांत सौम्य व्यक्ती आहे. दिग्दर्शनाबरोबरच तो एक उत्तम कथाकार आहे. त्यामुळे तुझ्या प्रमासाठी कामगिरीसाठी धन्यवाद रॉड असं म्हणत खेर यांनी रॉडचे आभार मानले आहेत.

follow us

वेब स्टोरीज