Anupam Kher यांनी दाखवली ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची’ पहिली झलक

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 01T144302.104

Anupam Kher Shared NMACC Inside Video: अंबानी कुटुंबाने ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’चा भव्य सोहळा आयोजित केला होता. (Inside Video) या सोहळ्याला देश-विदेशातील मान्यवरांसह बी-टाऊनचे सर्व सेलिब्रिटीही पोहोचले होते. त्याचवेळी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा आतील व्हिडिओ शेअर केला आहे. अनुपम यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ हे देशातील सर्वात मोठं कलाकारांसाठी कलाकेंद्र ठरणार आहे. तसेच या कार्यक्रमात प्रवेश करणारे ते पहिले पाहुणे असल्याचे सांगितले. शुक्रवारी भव्य शुभारंभ करून हे केंद्र लोकांसाठी खुले करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)


व्हिडिओ शेअर

NMACC चा आतला व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी लिहिले, “नीता आणि मुकेश अंबानी यांनी मुंबईच्या मध्यभागी छान सांस्कृतिक केंद्र निर्माण केले आहे! जगातील सर्वोत्तमांपैकी एक, नव्याने बांधलेल्या सभागृहात प्रवेश करणारे पहिले पाहुणे असल्याचा अभिमान! आणि माझा मित्र फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेल्या सिव्हिलायझेशन टू नेशनच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहा. विजयी व्हा…” अशी पोस्ट करत त्यांनी सांगितलं आहे.

NMACC आतून कसे दिसते

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या आतील व्हिडिओमध्ये अनुपम यांनी एक मोठा स्टेज, बसण्याची जागा दिसत आहे. तसेच, बाजूला अनेक बाल्कनी आणि बसण्याची जागा असलेल्या अतिरिक्त मजल्यामुळे ते भव्य दिसते. अनुपम म्हणतात, “हे जगातील कोणत्याही सांस्कृतिक केंद्राशी स्पर्धा करू शकते, खरं तर मी म्हणेन की ते त्यांच्यापेक्षा चांगले आहे.” ‘अत्याधुनिक’ केंद्र आता आपल्या ‘देशाचा वारसा’ आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Sara Ali Khan: नवाब सैफ अली खानच्या मुलीला करायचाय कार्तिकसोबत पुन्हा रोमान्स!

दिग्गजांची हजेरी

‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उद्धाटन सोहळ्याला मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली. सिनेजगतातील मंडळींसह, क्रीडा, संगीत, मॉडेलिंग आणि राजकीय क्षेत्रात मधील बडे नेते मंडळींनी या सोहळ्याला हजेरी लावली. तसेच अनेक उद्योगपतीदेखील उपस्थित होते. ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’चा उद्धाटन सोहळा खूपच जोरदार पार पडला. अंबानी कुटुंबियांनी सर्व विविध क्षेत्रात सर्व दिग्गज मंडळींचे स्वागत केलं.

‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उद्धाटन सोहळ्यालातील अंबानी कुटुंबियांचा लूक खूपच खास होता. मुकेश अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंच यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. उद्धाटन सोहळ्यादरम्यान नीता अंबानी म्हणाल्या,”नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ हे जगातील सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक केंद्रापैकी एक आहे. जगभरातील कलाकारांचं या कलाकेंद्रात स्वागत आहे.

Tags

follow us