‘कोलंबस’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच! कोलंबस”च्या निमित्ताने अंकुर वाढवे ची अनोख्या इंडस्ट्रीमध्ये होणार एंट्री!

अत्यंत वेगळ्या धाटणीच्या या कथानकतून प्रेक्षकांच पुरेपूर मनोरंजन होणार असून, 11 डिसेंबरला "कोलंबस" संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Untitled Design   2026 11 16T135949.342

Untitled Design 2026 11 16T135949.342

Teaser for the film ‘Columbus’ launched on social media : शिक्षक होण्याचं स्वप्न पाहून उच्च शिक्षित झालेल्या, पण नोकरी मिळत नाही म्हणून एका वेगळ्याच इंडस्ट्रीमध्ये जाऊन आपले नशीब घडवण्याचा विचार करणाऱ्या तरुणाची गोष्ट आपल्याला कोलंबस या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीच्या या कथानकतून प्रेक्षकांच पुरेपूर मनोरंजन होणार असून, 11 डिसेंबरला “कोलंबस” संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

एस एस आर फिल्म्स प्रस्तुत ‘कोलंबस’ या चित्रपटाची निर्मिती सतीश नाईक, रोहित गुप्ता, सनोबर लाकडावाला यांनी केली आहे. रवींद्र शिवाजी यांनी दिग्दर्शन, गौरव कुलकर्णी यांनी छायालेखन, रोहन पाटील, सुयश जाधव यांनी संकलन, वैभव शिरोळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चैतन्य पिसाळ यांनी लेखन आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत केलं आहे, तर आनंद शिंदे, कैलास वाघमारे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. चित्रपटात अंकुर वाढवे, रोहित माने, सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले किरण माने त्याचबरोबर सिमरन खेडकर, अश्विनी भांडे, प्रसाद माने, हेमंत शिंदे, चंद्रकांत मोकल, संस्कार हिरे यांचा दमदार अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सुद्धा मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत. मुकुंद हंगेकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

तीन बडे नेते, 45 मिनिटांची बैठक आणि अनेक राजकीय मुद्दे! अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात नेमकं काय घडलं?

केवळ तीन फुट उंची असलेल्या कैलास नावाच्या तरुणाने शिक्षक होण्याचं स्वप्न पाहून उच्च शिक्षण घेतलेलं असतं. पण शिक्षणाचं खासगीकरण, सरकारी शिक्षक भरती न होणे अशा अडचणींमुळे त्याचं शिक्षक होण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. अशा वेळी त्याला थेट अमेरिकेतून संधी चालून येते. मात्र ही संधी असते एका अनोख्या इंडस्ट्री मध्ये काम करण्याची. अशी ही कोणती इंडस्ट्री आहे ज्यामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडतो, आलेल्या संधीचं तो काय करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं धमाल पद्धतीनं चित्रपटातून देण्यात आली आहेत. उत्तम कथानकाला दमदार कलाकार आणि अभिनयाची जोड हे “कोलंबस” चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य आहे.

अत्यंत वेगळं कथानक मांडतानाच तरुणाईची मनोवस्था, आजची रोजगार समस्या, ग्रामीण भागातील स्थिती यावर हलक्याफुलक्या पद्धतीनं चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे.

Teaser Link

https://www.instagram.com/reel/Dfyp5xioogV/?cplk=MXFmejlua20ycW01NA==

Exit mobile version