Tunisha Sharma Suicide प्रकरणातील आरोपी शीझान खानला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

मुंबई : तुनिषा शर्मा हत्याकांड प्रकरणातील (Tunisha Sharma Suicide Case) आरोपी शीझान खानला (sheezan khan ) 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. वसई कोर्टाकडून (Vasai Court) हा जामीन मंजूर करण्यात आला. त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान तुनिषा आणि शिझान एकाच मालिकेत काम करत होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. तुनिषाने मालिकेच्या सेटवर शिझानच्याच […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 04T153958.678

Tunisha Sharma Suicide Case

मुंबई : तुनिषा शर्मा हत्याकांड प्रकरणातील (Tunisha Sharma Suicide Case) आरोपी शीझान खानला (sheezan khan ) 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. वसई कोर्टाकडून (Vasai Court) हा जामीन मंजूर करण्यात आला. त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान तुनिषा आणि शिझान एकाच मालिकेत काम करत होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. तुनिषाने मालिकेच्या सेटवर शिझानच्याच मेकअपरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती.

शीजानकडून तुनिषाला मारहाण :  एवढेच नाही तर शीजानने ( Sheezhan Khan ) तुनिशाला मारहान देखील केली होती असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मीडियाशी बोलताना तुनिषाची आई वनिता शर्मा की, शीजनचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याची तुनिषाला आधीच माहिती होती. ‘तुनिषाने शीजानच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीसोबत झालेल्या चॅट वाचले होते. त्यामुळेच दोघांचे ब्रेकअप झाले. त्यावर शीजानने तुनिशाला सांगितले की, तुला जे करायचे आहे ते कर. या प्रकरणात शीजनची आई, बहीण यांचाही सहभाग आहे असे शर्मा म्हणाल्या.

‘शीजानला शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही’ : तुनिषाची आई पुढे म्हणाली, ‘शीझान खानला शिक्षा होईपर्यंत मी शांत बसणार नाही. शीजनने माझ्या मुलीशी लग्न करण्याचे वचन दिले होते.मात्र, त्याने तनुषा सोबत फसवणूक केली. माझी मुलगी गेली, आता मी एकटी आहे. माझ्या मुलीला कोणताही आजार नव्हता. तीला फक्त OCD (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर) ची समस्या होती.

‘शीजानची आई तुनिषाचा छळ करायची’: तुनिशाच्या आईने दावा केला आहे की, शीजान, त्याचे कुटुंब तुनिषाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडत होते. ‘शीजानसह त्याचे कुटुंबीय तुनिशाला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगायचे. शीजानची बहीण तुनिशाला दर्ग्यात घेऊन जायची. माझी मुलगी त्याच्या बोलण्यात पूर्णपणे गुंतली होती. त्याच्या सांगण्यावरून तनुषा तशी वागत असे. त्याची आई माझ्या मुलीला त्रास देत असे. तीला कुत्र्यांची भीती वाटत होती पण, शीजानच्या आईच्या सांगण्यावरून तुनिषाने घरात एक कुत्राही पाळला होता. तुम्ही विचार करा, माझ्या मुलीवर त्याचा किती प्रभाव होता. शीजानला भेटल्यानंतर तिने हिजाब घालायला सुरुवात केली. त्याच्याकडून उर्दू शिकायला सुरुवात केली.

Brahmastra 2 मध्ये दिसणार ‘रॉकी भाई’? अयान मुखर्जींनी सांगितली रिलीज डेट

तुनिशाला ख्रिसमसला चंदीगडला जायचे होते : शनिवारी तुनिषाच्या मृत्यूचा संदर्भ देत वनिता शर्मा पुढे म्हणाल्या, ‘ती आदल्या रात्री सेटवर शीजनशी बोलायला गेली होती. शीजान तीला म्हणाला तुला जे करायचं ते कर. माझी मुलगी आनंदी होती, नाराज नव्हती. ती दोन दिवसांची सुट्टी घेऊन चंदीगडला ख्रिसमस साजरा करण्यासाठी जाणार होती. शनिवारी दिवसभर मी बोलले होते. तिला चंदीगडला जायचे असल्याचे तिने माला सांगितले होते.

‘शीझान खान ड्रग्ज घेत असल्याचं तुनिषाने सांगितलं होतं’ : तुनिषाच्या आईने दावा केला आहे की, शीझान खान टीव्ही शोच्या सेटवर ड्रग्ज घेत असे. ‘हे असं कधीपासून होतं मला माहीत नाही. पण तुनिशानेच मला सांगितले की शीजान टीव्ही शोच्या सेटवर ड्रग्ज सेवन करत असे. तुनिषाच्या वागण्यात बदल होऊ लागला होता. त्या दिवशी तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट देखील केली होती, पण त्यानंतर काय झाले, आम्हाला माहित नाही.

Exit mobile version