Download App

MHJ Fame Actor: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला ‘जवान’ची भूरळ; Video Viral

Pruthvik Pratap Jawan Look Viral: किंग खानचा बहुचर्चित ‘जवान’ सिनेमा काल (७ सप्टेंबर) सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमागृहामध्ये किंग खानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सध्या सोशल मीडियावर सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. किंग खानच्या अनेक चाहत्यांनी सिनेमा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघायला चांगलीच पसंदी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनाच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटींना देखील सिनेमाची क्रेझ आहे. सध्या सोशल मीडियावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील एका कलाकाराला ‘जवान’ची भूरळ पडल्याची बघायला मिळत आहे.


कायमच चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणारा कॉमेडी शो म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कडे बघितले जाते. (Maharashtrachi Hasyajatra) शो प्रमाणे यामधील कलाकार सुद्धा जोरदार चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर आपल्या दमदार कॉमेडीसाठी अवघ्या महाराष्ट्राभर प्रसिद्ध असलेला पृथ्वीक प्रताप जोरदार चर्चेत आला आहे. पृथ्वीक प्रतापला सुद्धा ‘जवान’ची भूरळ पडल्याची बघायला मिळत आहे. पृथ्वीने नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याच्या व्हिडीओची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.

पृथ्वीकने शेअर केलेल्या व्हिडीओत, त्याने अगदी सेम टू सेम किंग खान सारखा ‘बाल्ड लूक’ केला आहे. या ‘बाल्ड लूक’मध्ये पृथ्वीक पूर्णपणे किंग खान सारखाच नाचत असल्याचे बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना त्याने कॅप्शन दिले की, “जवानच्या पार्श्वभूमीवर हा रील आणि दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय” दरम्यान अभिनेत्याचं हे कॅप्शन जोरदार चर्चेत आलं आहे. पृथ्वीक प्रतापच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांसह त्याच्या काही सेलिब्रिटी मित्र- मैत्रिणीनी प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे.

Kangana Ranaut: ‘जवान’चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘शाहरुख हा…’

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी भाषेमध्ये या सिनेमाने ६५ कोटींचा गल्ला कमावला आहे. तमिळ भाषेमध्ये सिनेमाने ५ कोटींचा गल्ला, तर तेलुगू भाषेत या सिनेमाने ५ कोटी कमावले आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी एकूण ७५ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर जागतिक पातळीवर या सिनेमाने पहिल्या दिवशी १२० कोटींचा गल्ला जमवल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल १० सिनेमाचा विक्रम मोडीत बघायला मिळत आहे.

मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादसह अनेक शहरात या सिनेमाने जोरदार कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमामधील कलाकार, दिग्दर्शन, कथानक, कलादिग्दर्शन, संगीत आणि इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टींना या सिनेमाला अगदी चार चांद लागल्याचे बघायला मिळत आहे. तसेच सध्या ‘जवान’ची ७ लाखांहून अधिक तिकिट अ‍ॅडव्हांस बुकिंगमध्ये विकली गेल्याची देखील माहिती मिळाली होती. या सिनेमाने अ‍ॅडव्हांस बुकिंगच्या ३ दिवसामध्येच सुमारे २१.१४ कोटीचा गल्ला कमावला आहे. ‘जवान’ या सिनेमात किंग खानबरोबर नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारख्या अभिनेत्रीही झळकले आहे. दीपिका पदुकोण, विजय सेतुपती हे कलाकार देखील सिनेमात दिसत आहे.

Tags

follow us