Download App

Leo Trailer: थलपती विजयची क्रेझ, लिओ’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

Leo Trailer Out: तमिळनाडू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपतीच्या (Thalapathy Vijay) बहुचर्चित ‘लिओ’ (Leo Trailer) सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. गेल्या काही  दिवसांपासून सिनेमाची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा रंगत होती. धमाकेदार ॲक्शन आणि अफलातून ड्रामा असलेल्या या सिनेमात बॉलिवूडसह (Bollywood) टॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे.

या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच, अवघ्या काही क्षणातमध्येच सिनेमाच्या ट्रेलरची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमात थलपती विजय, त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. सिनेमा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर विजय थलपतीच्या डॅशिंग लूकची सजोर्दार चर्चा सुरु आहे. या सिनेमाची कथा लिओभोवती फिरत असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाची कथा भुतकाळातील आहे.

या सिनेमात अनेक पात्रांचा भुतकाळ आपल्याला यावेळी बघायला मिळणार आहे. विजय थलपतीचा हा थरारक सिनेमात लोकेश कनगराजच्या ‘कार्थी’ आणि ‘विक्रम’ प्रमाणे आहे. हा सिनेमा एकाच युनिव्हर्समधील आहे. या सिनेमात दमदार व्हीएफएक्सचा वापर करत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्राण्यांसोबतच्या काही सीन्समध्ये व्हीएफएक्सचा वापर करुन जसेच्या तसे सीन्स सादर करण्यात आले आहेत. हा सिनेमा लोकेस सिनेमॅटीक युनिव्हर्समधील आहे.

रणबीरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशीला ED चे समन्स, सखोल चौकशी होणार

यामुळे प्रदर्शनाच्या अगोदरच या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. तमिळ, तेलुगू आणि कन्नडप्रमाणे हिंदीमध्ये देखील विजयचा सिनेमा अनेक रेकॉर्ड मोडीमध्ये काढणार यामध्ये काही शंका नसणार आहे. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करत असून सिनेमाची निर्मितीची धुरा ललित कुमार यांनी सांभाळली आहे.

Tags

follow us