रणबीरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशीला ED चे समन्स, सखोल चौकशी होणार

रणबीरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशीला ED चे समन्स, सखोल चौकशी होणार

ED has issued summons to Kapil Sharma : काल बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स पाठवल होते. या घटनेमुळं बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. महादेव गेमिंग-बेटिंग प्रकरणात (Mahadev Gaming-Betting) रणबीरचं नाव पुढं आल्यानं ईडीने त्याला चौकशीसाठी बोलावल आले. अशातच आता महादेव बुक अॅप प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma, अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि हिना खान यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

मनोज जरांगे 50 खोक्यांची ऑफर? आंदोलन मॅनेजबद्दल जरांगेंनी स्पष्टच सांगितलं 

महादेव अॅप हे ऑनलाइन बेटिंग अॅप आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपचे मालक आहेत. सौरभ चंद्राकरने यावर्षी UAE मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. सौरभने लग्नावर जवळपास 200 कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि इतर अनेक स्टार्सनीही या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांनी या लग्नाला केवळ लग्नाला हजेरी लावली नाही तर परफॉर्मही केला. एवढेच नाही तर त्यांनी सौरभच्या ऑनलाइन बेटिंग अॅपची जाहिरातही केली. या सगळ्यासाठी त्यांना रोख रक्कम देण्यात आली. याच कारणामुळे ईडीने या सेलिब्रिटींना समन्स बजावले आहे. याप्रकरणी ईडी त्याची चौकशी करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने सप्टेंबर महिन्यात महादेव अॅपची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी ईडीने कोलकाता, भोपाळ, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये छापे टाकून सुमारे 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली होती.

या अॅपच्या जाहिरातीमुळ यापूर्वी अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. यापूर्वी सनी लिओनीसह भाग्यश्री, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, भारती सिंग, एली अवराम यांचीही चौकशीहदी झाली. आता हे धागेदोरे रणबीर, कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांच्या पर्यंत पोहोचले आहेत.

दरम्यान, ईडीने रणबीर कपूरला उद्या म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी रायपूर येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. मात्र, रणबीर कपूरने ईडीकडे ईमेलद्वारे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. त्यामुळं या प्रकरणात काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube