मनोज जरांगे 50 खोक्यांची ऑफर? आंदोलन मॅनेजबद्दल जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange : वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ, पण माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणार असल्याचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी आज धाराशिवमधील कळंबमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर…
माध्यमांशी बोलत असतानाच आंदोलन गुंडाळण्यासाठी 50 ऑफर मिळाल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी जरांगे म्हणाले, “मला पैशांचं कोणी बोलूच शकत नाही. खरं सांगतोय, मला तसं काही बोलले असते, तर मी थेट बोललो असतो, मी काही पोटात ठेवलं नसतं सर्व समाजाला सांगितलं असतं की हे लोक मला असं बोलतायत, कारण मला भिडभाड नाही आपलं जे असतं ते दणकून असतं या शब्दांत मनोज जरांगे यांनी ठणकावत सांगितलं आहे.
भाजपकडे बहुमत असताना ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? पवारांचा फडणवीसांना खोचक सवाल
ते मला असं म्हणूच शकत नाहीत कारण मला ते अनेक वर्षांपासून बघतायत त्यांनी माझी आंदोलनं हातळली आहेत, आज आहेत त्यांनीपण आणि अगोदरच्यांनी पण माझी आंदोलनं बघितली आहेत त्यांना सगळं माहिती असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Aatmapaphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर पोहोचला आत्मपॅम्प्लेटच्या सेटवर
दरम्यान, मी यांच्या गाडीतसुद्धा बसत नाही. कधी मुंबईला वगैरे एखाद्या बैठकीला जायचं असेल तर आम्ही आमची वर्गणी काढतो, गाडी ठरवतो आणि आमची सगळी माणसं जातो. त्यांच्याबरोबर जेवतसुद्धा नाही. वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे आणि आजवर माझं असंच काम राहणार असल्याचंही जरांगे यांनी सांगितलं आहे.
Baramati Agro : ‘मी डगमगणार नाही अन् झुकणार नाही’; काररखान्याच्या नोटीसीवरून रोहित पवारांनी सुनावलं
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सलग 15 दिवस आमरण केलेले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 40 दिवसांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.
रुग्णालयातून सुट्टी मिळताच जरांगे यांनी पुन्हा साखळी उपोषण सुरु केलं असून आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यसभरातील मराठा बांधवांसोबत संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला जाहीर सभा घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.