अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर…

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर…

Supriya Sule On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar)यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करुन भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला काही मंत्रिपदं देण्यात आली. त्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister)होतील असं म्हटलं होतं. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांना प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार मी घालेन. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खासदार सुळे यांनी आज नांदेडमध्ये (Nanded)माध्यमांशी संवाद साधला.

Harshvardhan Kapoor: ओल्ड ट्रॅफर्ड येथे डेनिस इर्विनसोबत हर्षवर्धन कपूरची अनोखी भेट

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वात आधी पहिला हार मी घालेन, असं असलं तरी सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हाडाच्या भाजपच्या नेत्यांचे हात सुरु आहेत.

भाजपने सत्ता कशी मिळवली?; शरद पवारांनी सांगून टाकलं

मला आनंद आहे की, सध्या युतीच्या पहिल्या पंक्तीमध्ये आमचेच सहकारी नेते बसलेले आहेत. त्याचवेळी खासदार सुळे यांनी नांदेडमधील घटनेबद्दल सांगितले की, या घटनेत एका दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांचा दादांवर विश्वास नसेल पण भाऊ म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे.

तसेच फडणवीसांनी दरदरोज शरद पवारांना नावं ठेवावी पण नांदेडमधील लोकांना चांगले आणि योग्य उपचार द्यावेत असेही आवाहन यावेळी सुळे यांनी केले. नांदेडची घटना वेदना देणारी आहे.

ट्रीपल इंजिन सरकार दिल्लीला जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जायला वेळ आहे पण नांदेडला येण्यासाठी वेळ नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube