भाजपने सत्ता कशी मिळवली? शरद पवारांनी सांगून टाकलं

भाजपने सत्ता कशी मिळवली? शरद पवारांनी सांगून टाकलं

Sharad Pawar On BJP : भाजपने सरकारं पाडून अनेक राज्यात सत्ता मिळवली असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपवर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज दिल्लीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवरुन भाजपला घेरलं आहे.

Sanjay Raut : .. तर अजितदादांचीही आमदारकी रद्द होईल! राऊतांचा खळबळजनक दावा

शरद पवार म्हणाले, देशातील अनेक राज्यात भाजपने सरकारं पाडून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अनेक राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, आज गावागावात ईडीच्या धमक्या दिल्या जात आहे. ईडीचा सरासपणे गैरवापर केला जात असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Aatmapaphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर पोहोचला आत्मपॅम्प्लेटच्या सेटवर

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात दाखल झाला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवारांना उद्याच हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

Bacchu Kadu : ‘मला भाजपाचा खूप त्रास’; बच्चू कडूंच्या आरोपाने वादाची ठिणगी

निवडणूक आयोगात सुरु असलेल्या वादावरही शरद पवार यांनी भाष्य केलं असून माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नसल्याची टोलेबाजी शरद पवार यांनी अजित पवार गटावर केली आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांचा नवा प्लॅन! सरकारला घेरण्यासाठी युवा संघर्ष यात्रा

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच असून काही जण चुकीच्या मार्गाने दुसरीकडे गेले आहेत. माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागो, आम्हाला चिंता नसल्याचं शरद पवार यांनी अजित पवार गटाला सांगितलं आहे.

तसेच माझ्या नावाचा 70 लोकांनी प्रस्तावर दिला आहे. आयोगाचा निकाल काहीही लागू पण आमच्या बाजूनेच निकाल लागणार असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार गटात पक्ष आणि चिन्हासाठी सुरु असलेल्या वादात कोणत्या गटाला पक्ष आणि चिन्ह मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ईडीचा वापर महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही, तर अन्य राज्यात देखील हे चाललं आहे. आपच्या राज्यसभा सदस्याच्या घरावर सकाळी ७ वाजल्यापासून छापा टाकून त्यांना रात्री अटक करण्यात आली. आज सकाळपासून तामिळनाडूतील द्रमुक नेत्यांच्या घरांवर छापे टाकण्यात येत आहेत.


नांदेडमध्ये 24 तासात 24 मृत्यू! हाफकिनकडून औषध खरेदी का बंद केली, पर्यायी व्यवस्था कोणती उभारली?

पश्चिम बंगालमध्येही छापे टाकले जात आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना १३ महिने तुरुंगवास भोगावा लागला. नंतर काहीही सिद्ध झाले नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांना तुरुंगात टाकण्यात आले. का तर ते भाजपविरोधात लिहीत होते? भाजप सूड बुध्दीने ह्या कारवाया करत असल्याचं पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube