Rohit Pawar : रोहित पवारांचा नवा प्लॅन! सरकारला घेरण्यासाठी युवा संघर्ष यात्रा
Rohit Pawar : माझ्यावर याआधीपाासून कारवाई सुरू आहे, आता देखील नोटीस आली (Rohit Pawar) तरी संघर्ष यात्रा काढली जाईल. मी हार मानून घरी बसणार नाही. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) फोडली. कुटुंब फोडले तरीही आम्ही लढत आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून हजार रुपये का घेता प्रश्न विचारल्यावर सरकार विद्यार्थी सिरियस नाहीत म्हणतात. आंदोलने, उपोषण केले तरी केवळ शब्द मिळतो अशा शब्दांत आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणााघाती टीका केली. तसेच 25 ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
Video : ”तेवढं पवार साहेबांना सोडू नका”; चिमुकल्याचा अमोल कोल्हेंना ‘कानात’ सल्ला
युवकांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे (Rohit Pawar) काम सरकारकडून सुरू आहे. अशा परिस्थितीत काय करायला हवे, हे विचारल्यानंतर मलाही ही गोष्ट जाणवली. युवा संघर्ष यात्रा काढण्याचा विचार आम्ही केला असून सायकल, गाडीवर नाहीतर पुण्यातून पदयात्रा काढण्यात येईल. दसऱ्याच्या दिवशी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढण्यात येईल. लाल महाल, देहू आळंदी संत पिठाला नतमस्तक होत यात्रेला सुरुवात होईल. एकूण 820 किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. 13 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा प्रवास करेल.
संघर्ष यात्रेतून ‘या’ मागण्या करणार
कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी, विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी हजार रुपये फी रद्द करण्यात यावी आणि आधी घेतलेले एक हजार रुपये परत करण्यात यावेत, दत्तक देण्यात येणाऱ्या शाळांचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशा मागण्या या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत. 7 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील हे मुद्दे मांडण्यात येतील. युवक त्यांच्या प्रश्नावर किती गंभीर आहेत हे सरकारला दाखवून देऊ, असा इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला.
आरोग्यमंत्र्यांचं हाफकिनशी जवळचं नातं, आधी राजीनामा द्या
नांदेड सरकारी रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरही त्यांनी भाष्य केले. रुग्णांना औषधे मिळत नाहीत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि हाफकिनचे जवळचे नाते आहे. त्यांनी आजच राजीनामा द्यायला हवा. जाहिराती करून हिरो बनण्याचा प्रयत्न तुम्ही करता, मात्र उद्या कुटुंबासाठी हिरो बनणारी लहान मुले दगावत आहेत. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बसून फाईल मंजूर केली जाते. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून बिल पास करण्यासाठी देखील पैसे घेतले जातात. महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था बनली आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.
विधानसभेत टाईमपास – 1, 2, 3 सिरीज सुरु, दिग्दर्शक अध्यक्ष राहुल नार्वेकर : राऊतांचा खोचक टोला