Video : “तेवढं पवार साहेबांना सोडू नका”; चिमुकल्याचा अमोल कोल्हेंना ‘कानात’ सल्ला
सातारा : मध्यंतरी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीसोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद सुरू आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यतील विविध भागात जात सभा घेतल्या या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांशी शरद पवारांची नाळ जोडल्याचं पवारांच्या दौऱ्यात दिसून आले आहे. याचाच एक प्रत्यय साताऱ्यात आला असून, एका कार्यक्रमात एका चिमुरड्याने बक्षीस घेतल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) कानात तेवढं पवार साहेबांना सोडू नका अशी साद घतली आहे. याबाबतचा किस्सा सांगत कोल्हेंनी एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. (Amol Kolhe Share Small Kid Video)
जातीय जनगणनेवरुन केंद्र अन् राज्य भाजपमध्ये विरुद्ध प्रवाह? बावनकुळे आग्रही; मोदींची टीका
घडलेल्या या घटने विषयी बोलताना कोल्हे म्हणाले की, मी नुकताच एका खासगी शाळेच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून हजेरी लावली होती. यावेळी या सोहळ्यात बक्षीस मिळालेल्या एका चिमुकल्याने बक्षीस घेतल्यानंतर एक चिमुरडा माझ्याजवळ आला आणि मला काहीतरी तुमच्या कानात सांगयचे आहे असे सांगितले. त्यावर मी खाली वाकलो त्यावेळी त्या चिमुरड्याने माझ्या कानात तेवढं पवार साहेबांना सोडू नका असे वाक्य सांगितल्याचे कोल्हे म्हणाले.
विधानसभेत टाईमपास – 1, 2, 3 सिरीज सुरु, दिग्दर्शक अध्यक्ष राहुल नार्वेकर : राऊतांचा खोचक टोला
एवढसं पोरगं ही गोष्टी सांगतो हा माझ्यासाठी शॉक
हा किस्सा सांगितल्यानंतर कोल्हे म्हणाले की, खासदाराला कानात काहीतरी सांगायचंय म्हणून त्याच्याशी थेट बोलण्याची धिटाई आजच्या नव्या पिढीत आहे याचे मला अप्रुप वाटते. तसेच या चिमुरड्याने जे मला कानात सांगितले त्यावरून त्याच्या घरातील राजकीय सजगता लक्षात येते असे सांगत एवढ्याशा पोरानं तेवढं पवार साहेबांना सोडू नका हे सांगणे माझ्यासाठी शॉक असलयाचे कोल्हेंनी यावेळी सांगितले.
…म्हणून अमोलदादांच्या कानात ही गोष्टी सांगितली
दुसरीकडे ज्या चिमुरड्याने अमोल कोल्हेंच्या कानात ही गोष्टी सांगितली त्याने सध्याच्या परिस्थितीत सर्व जवळची माणसं पवार साहेबांना सोडून जात आहेत. म्हणून मी अमोलदादांच्या कानात सांगितले की तुम्ही तरी त्यांना सोडू नका अशी साद घातल्याचे त्याने सांगितले.
एका चिमुकल्याने कानात येऊन मला सांगितलं की "पवार साहेबांना सोडू नका!"#शरदपवार #SharadPawar #आम्ही_साहेबांसोबत #मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @Awhadspeaks @DrFauziaKhanNCP @ShriPatilKarad @MPVandanaChavan @MPVandanaChavan @faizalpp786… pic.twitter.com/a4KrKDrOTM
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 2, 2023