जातीय जनगणनेवरुन केंद्र अन् राज्य भाजपमध्ये विरुद्ध प्रवाह? बावनकुळे आग्रही; मोदींची टीका

जातीय जनगणनेवरुन केंद्र अन् राज्य भाजपमध्ये विरुद्ध प्रवाह? बावनकुळे आग्रही; मोदींची टीका

मुंबई : बिहारने नुकतीच जातीय जनगणना करत काल त्याची आकडेवारीही जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्रातही जातीय जनगणनेची मागणी जोर धरत आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी यासंदर्भात उघडपणे मागणी केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आपण राज्य सरकारकडे मागणी करावी अशी विनंती देशमुखांनी केली. त्यामुळे आता राज्य भाजप जातीय जनगणेसाठी आग्रही असल्याच दिसून आले आहे. पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मात्र जातीय जनगणनेवरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Center and Maharashtra BJP are showing opposing positions for caste census.)

काल मध्यप्रदेशमध्ये जाहीर सभेत बोलताना त्यांनी जातीय जनगणना करुन विरोधी पक्ष हे समाजाची जातीच्या आधारावर विभागणी करत असल्याचा आरोप केला. मागील सहा दशके विरोधकांनी गरिबांच्या भावनांशी खेळ करत देशाची जातीच्या आधारावर विभागणी केली होती. आता तेच पाप पुन्हा केले जात आहे, असे मोदीही म्हणाले. यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा अप्रत्यक्षपणे नितीशकुमार यांच्या दिशेने होता. मात्र यामुळे आता राज्य भाजपमध्ये आणि संपूर्ण भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीय जनगणेवरुन परस्पर विरोधी भूमिका दिसून येत आहेत.

Bihar Caste Survey Results : जातीनिहाय जनगणना अन् कास्ट; बिहार सर्व्हेची संपूर्ण ABCD

बिहार सरकारने जातीनिहाय आकडेवारी आकडेवारी केल्यानंतर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने देशभरात जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. काँग्रेसने तर आम्ही सत्तेत आलो तर आधी अशाप्रकारची जनगणना करू असे म्हटले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील सभेत जातीनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार केला होता.

बिहारमध्ये कोणती जात आणि किती टक्के?

बिहारमध्ये करण्यात आलेल्या जात आधारित सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, बिहारची एकूण लोकसंख्या 13 कोटींहून अधिक आहे. राज्यात मागासवर्गीयांची संख्या 27.13%, अत्यंत मागासवर्गीय 36.01%, सामान्य वर्ग 15.52% असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या ही अत्यंत मागासवर्गीयांची आहे. लोकसंख्येनुसार अत्यंत मागासवर्ग 36.01 टक्के असून त्यांची संख्या 4,70,80,514 आहे. तर मागासवर्गीय 27.12 टक्के असून त्यांची संख्या 3,54,63,936 आहे.

Caste Based Census Report : नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक; जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर

अनुसूचित जाती 19.6518 % असून त्यांची लोकसंख्या 2,56,89,820 आहे तर, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 21,99,361 आहे जी एकूण लोकसंख्येच्या 1.6824 % आहे. अनारक्षित म्हणजेच सर्वसाधारण जातीची लोकसंख्या  2 कोटी 2 लाख 91 हजार 679 आहे जी बिहारच्या एकूण लोकसंख्येच्या 15.5224 टक्के आहे.

बिहारमधील जातींची टक्केवारी किती? 

जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात नितीश सरकारने एकूण 215 जातींची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमधील जातनिहाय लोकसंख्या मुस्लिम- 17.70 टक्के, यादव- 14. 26 टक्के, कुर्मी – 2.87 टक्के, कुशवाह- 4.21 टक्के, ब्राह्मण- 3.65  टक्के, भूमिहार- 2.86 टक्के, राजपूत- 3.45 टक्के, मुशार- 3.08 टक्के, मल्लाह- 2.60 टक्के, व्यापारी –2.31 टक्के, कायस्थ – 0.60 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube