विधानसभेत टाईमपास – 1, 2, 3 सिरीज सुरु, दिग्दर्शक अध्यक्ष राहुल नार्वेकर : राऊतांचा खोचक टोला

विधानसभेत टाईमपास – 1, 2, 3 सिरीज सुरु, दिग्दर्शक अध्यक्ष राहुल नार्वेकर : राऊतांचा खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत टाईमपास 1, 2, 3 अशी सिरीज सुरु आहे, त्याचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आहेत, असा खोचक टोला शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नांदेड येथील घटनेवरुन शिंदे सरकरावर टीका केली. शिवाय जातीयजनगणेवरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं. (Sanjay Raut criticizes Rahul Narvekar on MLA disqualification petition delay)

काय म्हणाले संजय राऊत?

विधानसभा अध्यक्षांकडील कामकाजाबाबत बोलताना राऊत म्हणाले, विधिमंडळाच्या कामाला वेग आला असं अजिबात बोलता येणार नाही. कारण अशा प्रकारचे समन्स पाठवून शिवसेना कोणाची विचारात असतील तर ते वेळ काढू पणा करत आहेत. दहा-बारा आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही. पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असतो. तरी विधिमंडळाकडून अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत.  कागदावरून शिवसेना कोणाची हे ठरत नाही.

Nanded Hospital मधील 24 रुग्णांचे मृत्यू शासन पुरस्कृत; विजय वडेट्टीवारांचे 5 गंभीर आरोप

बाळासाहेबांनी शिवसेना कागदावरती निर्माण केली नाही तर जनतेच्या मनामनात निर्माण केलेली आहे. आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही, हे माहित आहे. आम्हाला न्याय हा सर्वोच्च न्यायालयात मिळेल. आमच्यावरती अन्याय केलेला आहे, तो प्राथमिक निवडणूक आयोगाने केला आहे. भाजप जे बोलतात तेच निवडणूक आयोग का नेमक करतात? महाराष्ट्राच्या विधानसभेतही टाईमपास 1, 2, 3  अशी सिरीज सुरु आहे. त्याचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, करुदे त्यांना किती टाईमपास करायचा ते, पण आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल, असेही मत राऊत यांनी व्यक्त केले.

नांदेडवरुन राऊतांनी शिंदे सरकारला घेरले :

नांदेडमधील घटनेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, नांदेड सारख्या ठिकाणी, सरकारी रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण मृत्यू होतात, यावरुन कळत की राज्यात सरकार अस्तित्वातच नाही. ही पहिली घटना नाही, या आधी देखील ठाण्यातील कळव्याच्या पालिका रुग्णालयात देखील असा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. कळव्यातील प्रकरणानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की, ठाण्यामध्ये असा प्रकार कसा घडू शकतो? त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यचे टाळलं होत.

Ghati Hospital Death : धक्कादायक! नांदेडपाठोपाठ ‘घाटी’ रुग्णालयात 24 तासांत 10 मृत्यू

मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे पालक नाही ते संपूर्ण राज्याचे पालक आहेत. राज्यात औषधांचा तुटवडा असताना सरकारला फक्त जमिनीचा व्यवहार, परदेश दौरा, माणसे फोडण्यात यातच इंटरेस्ट उरलेला आहे. थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे. आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात इंटरेस्ट नसून वेगळाच कामात ते अडकलेले असतात. सरकारला याचं गांभीर्य काहीच वाटत नाही, असाही घणाघात संजय राऊत यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube