Nanded Hospital मधील 24 रुग्णांचे मृत्यू शासन पुरस्कृत; विजय वडेट्टीवारांचे 5 गंभीर आरोप

Nanded Hospital मधील 24 रुग्णांचे मृत्यू शासन पुरस्कृत; विजय वडेट्टीवारांचे 5 गंभीर आरोप

नांदेड :  नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील 24 तासांत झालेल्या 24 जणांच्या मृत्यूने (Nanded Hospital Deaths) राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यात आज आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाचप्रकारची घटना ताजी असतानाच आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या घटनेवर संताप व्यक्त करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हे सर्व मृत्यू राज्य सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. (Death of 24 patients in Nanded Hospital awarded by Government 5 serious allegations by Vijay wadettivar)

विजय वडेट्टीवर यांचे 5 गंभीर आरोप :

विजय वडेट्टीवार नागपूरमध्ये बोलताना म्हणाले, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. हे शासन पुरस्कृत मृत्यू आहेत. झालेल्या घटनेला शासन जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, या मागची करणे गंभीर आहेत. ही घटना घडताना राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या रुग्णालयाला पूर्णवेळ डीन नाहीत, सर्जन नाहीत, अनेक पदे रिक्त आहेत.

Nanded Hospital Deaths : मृत्यूचे तांडव सुरूच! सरकारी दवाखान्यात आणखी 7 मृत्यू; मृतांचा आकडा 31 वर

शिवाय रुग्णालयांना औषध पुरवठा बरोबर होत नाही.  या रुग्णालयातील रुग्णांची वेळेवर तपासणी होत नाही. मंत्री बदलले जातात, पण रुग्णालयाला निधी मिळत नाही. योजनांचा पाऊस पाडला जातो. पण लोकांच्या जीवाशी खेळायचे सुरु आहे. नांदेड प्रकरणात नंतर आता इतर ७८ रुग्णांचे जीव वाचवा, असेही आवाहन वडेट्टीवर यांनी सरकारला केले आहे.

आज आणखी 7 जणांचा मृत्यू :

काल दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आज यामध्ये आणखी सात जणांची भर पडली आहे. आजच्या मृतांमध्येही चार बालकांचा समावेश आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. त्यामुळे आता मृतांचा आकडा 31 वर गेला आहे. राज्य सरकारने या घटनेची जबाबदारी निश्चित करावी’, अशी मागणीही चव्हाण यांनी ट्विट करुन केली आहे.

Nanded Civil Hospital Death: अधिकाऱ्याच्या अट्टहासने घेतले चिमुरड्यांचे बळी?

तिघांची चौकशी समिती स्थापन :

दरम्यान, विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आज चौकशी समिती नांदेडमध्ये येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडमध्ये येऊन या घटनेची चौकशी करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज