Download App

The Atharva Sudame Show ची धमाल सुरू; अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेन्मेंट-नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती व पॉवर्ड बाय लेट्सअप असलेला शो

The Atharva Sudame Show: या खास शोची निर्मिती Anushaka Motion Pictures and Entertainmentची, तर नरेंद्र शांतीकुमारजी फिरोदिया हे निर्माते आहेत.

  • Written By: Last Updated:

The Atharva Sudame Show produced by Anushaka Motion Pictures and Entertainment : मार्मिक विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसविणारा अर्थव सुदामे नव्या वर्षात नवा शो घेऊन आलाय. द अर्थव सुदामे शो (The Atharva Sudame Show) असे नाव आहे. दररोज तुम्हाला बातम्या, विश्लेषण, खास व्हिडिओ देणारे ‘लेट्सअप’ या शोचा प्रस्तुत (Powered By) करता आहे. या खास शोची निर्मिती अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेन्मेंटची (Anushaka Motion Pictures and Entertainment) आहे. तर नरेंद्र शांतीकुमारजी फिरोदिया (Narendra Firodia) हे निर्माते आहेत. त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेविश्व आणि डिजिटल माध्यमात वेगवेगळ्या विषयाची आणि वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतीची निर्मिती केलीय. जसं की अंग बाई अरेच्चा 2, ट्रिपल सीट या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे.

अर्थव सुदामे हे नाव एेकूनच शो किती भन्नाट असणार हे तुम्हाला सांगायलाच नको. पहिल्या शो बुधवारी (८ जानेवारी) अर्थव सुदामे याच्या (Atharva Sudame) युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झालाय. या शोमध्ये जिओ स्टुडिओज् प्रस्तुत व श्री गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या कलाकारांची मांदियाळी पाहिला मिळणार आहे. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे, वैदैही परशुरामी, सुमीत राघवन, गायक शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, आनंद भाटे, प्रियंका बर्वे यांच्यासोबत गप्पांची मैफील झाली.

शोचे खास वैशिष्टे

The Atharva Sudame Show हा युट्यूबवरील शो आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी येऊन आपल्या नवीन सिनेमाचे, नाटकाचे प्रमोशन करू शकतात. या मध्ये अथर्व एक कॅफे चालवतो. ज्यामध्ये त्याचे दोन मित्र आहेत. बायको आणि एक वेटर आहे. जे लोक आलेल्या सेलिब्रिटीसोबत गप्पा मारतात, कोपरखळी, किस्से यातून फिल्मबद्दलची माहिती देतात. मनोरंजन आणि प्रमोशन असा असा शोचा भाग आहे.


अर्थवचे डिजिटल विश्व

अर्थव सुदामे हा इन्स्टाग्रामवरील एक इन्फ्लुएनसर आहे. ज्याचे इन्टाग्रामवर 16 लाख फॉलोवर्स, तर युट्यूबवर 10 लाख 16 हजार सबस्क्राइबर आहेत. अथर्व सुदामे हा त्याच्या विनोदी बोलण्यास प्रसिध्द आहे. आजवर त्याने आशा भोसले, कैलास खेर, ब्रेट ली, राज ठाकरे अशा अनेक मोठ्या लोकांसोबत रील्स केले आहेत.

follow us

संबंधित बातम्या