Download App

The Bageshwar Sarkar: ‘द बागेश्वर सरकार’… धीरेंद्र शास्त्रींवर आता सिनेमा येणार, कधी होणार रिलीज?

The Bageshwar Sarkar: मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) हे कायम चर्चेत येत आहेत. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरत असतो. धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारामध्ये लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या अनेक विषयांवरील वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत येत आहेत. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


‘द बागेश्वर सरकार’ असं या सिनेमाचे नाव आहे. एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी सांगितलं आहे की, बागेश्वर बाबा यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवण्यासाठी स्वतः बाबांनी (बागेश्वर बाबा) आशीर्वाद दिला आहे. बागेश्वर सरकार यांच्याशी सविस्तर बोलणे करून सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. ही स्क्रिप्ट आता 90 टक्क्यांपर्यंत लिहिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

कुठे होणार सिनेमाचे शूटिंग?

पुढे विनोद तिवारी यांनी सांगितलं आहे की, सिनेमाचे शूटिंग छतरपूर, भोपाळ, मध्य प्रदेश आणि देशाच्या अनेक भागामध्ये होणार आहे. तसेच या सिनेमाचा काही भाग लंडनमध्ये देखील शूट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिनेमामध्ये कोण साकारणार भूमिका?
विनोद तिवारी पुढे यांनी सांगितले आहे की, या सिनेमात बाबा बागेश्वर हे काम करणार नाहीत. सिनेमातील बाबा बागेश्वर सरकार आणि इतर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची माहिती नंतर जाहीर केली जाणार आहे. द बागेश्वर सरकार या सिनेमाचे शूटिंग या वर्षी सुरू होणार आहे. आगामी काळात हिंदी, इंग्रजी आणि भारतातील इतर अनेक भाषांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘The Kerala Story’ वरून सुरू असलेल्या वादावर कंगना रनौत पुन्हा उचकली; म्हणाली, “असे चित्रपट…”

मी बागेश्वर बाबा यांचा शिष्य असल्याने कोरोनाच्या काळात मी बाबांसमोर सिनेमा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. गेल्या वर्षभरापासून सिनेमाच्या स्क्रिप्टवर जोरदार काम सुरू आहे, अशी माहिती विनोद तिवारी यांनी या मुलाखतीमध्ये दिली होती. या सिनेमात बाबा बागेश्वर यांच्या बालपणातील संघर्षापासून ते जगभरात लोकप्रिय होण्यापर्यंतची कथा दाखवण्यात येणार असल्याचे विनोद तिवारी यांनी सांगितले आहे.

बागेश्वर बाबांबद्दलचे वाद, त्यांच्यावर ढोंगी असल्याचा आरोप, हे सर्व या सिनेमामधून दाखवले जाईल का? असा प्रश्न विनोद यांना विचारण्याच आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत विनोद तिवारी म्हणाले की, ‘सध्या या सिनेमाविषयी फार काही खुलासा करू शकत नाही. त्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. विनोद तिवारी हे द कन्व्हर्जन, तबादला यांसारख्या सिनेमांचे फिल्ममेकर आहेत.

Tags

follow us