Download App

The Bengal Files चे यूएस प्रीमियर ‘या’ शहरांमध्ये होणार, विवेक अग्निहोत्री – पल्लवी जोशी अमेरिका रवाना

The Bengal Files : विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द बंगाल फाइल्स' (The Bengal Files) हा चित्रपट यंदाच्या सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी

  • Written By: Last Updated:

The Bengal Files : विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ (The Bengal Files) हा चित्रपट यंदाच्या सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातोय. या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि निर्मातेही हा चित्रपट प्रभावी करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. भारतातील भव्य प्रदर्शानाआधी या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय प्रीमियर होणार असून, त्याची सुरुवात अमेरिका दौऱ्यापासून होत आहे. याच दौऱ्यासाठी विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) आणि पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांना अमेरिका रवाना होताना पाहण्यात आलं.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेक रंजन अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी ‘द बंगाल फाइल्स’ साठी 11 शहरांच्या अमेरिकन टूरवर रवाना झाले आहेत. या टूर अंतर्गत ‘नेव्हर अगेन’ (Never Again) मोहिमेद्वारे जगभरातील प्रेक्षकांसमोर ही सत्यकथा सादर केली जाणार आहे. या टूरमध्ये 10 मोठे शो होणार असून, याची सुरुवात 19 जुलै रोजी न्यू जर्सी येथून होईल आणि 10 ऑगस्टला ह्यूस्टन येथे समारोप होईल. ‘द बंगाल फाइल्स’चे अमेरिका टूरचे संपूर्ण शेड्यूल खालीलप्रमाणे आहे:

19 जुलै – न्यू जर्सी

20 जुलै – वॉशिंग्टन डीसी

25 जुलै – रॅली

26 जुलै – अटलांटा

27 जुलै – टॅम्पा

1 ऑगस्ट – फिनिक्स

2 ऑगस्ट – लॉस एंजेलिस

3 ऑगस्ट – एसएफ बे एरिया

7 ऑगस्ट – डेट्रॉईट

9 ऑगस्ट – शिकागो

10 ऑगस्ट – ह्यूस्टन

‘द बंगाल फाइल्स’ हे चित्रपट विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं आहे. अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी याचे निर्मिती केली असून, चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

मोठी बातमी, सीरिया लष्कराच्या मुख्यालयावर इस्रायलने केला बॉम्ब हल्ला; अनेकांचा मृत्यू 

तेज नारायण अग्रवाल आणि ‘आय एम बुद्धा’ बॅनरखाली बनलेला हा चित्रपट विवेक यांची ‘फाइल्स ट्रिलॉजी’चा भाग आहे, ज्यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ यांचा समावेश आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us