Deepika Padukone ने रचला इतिहास, हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Deepika Padukone ने रचला इतिहास, हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Deepika Padukone : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) इतिहास रचला आहे. दीपिकाची हॉलिवूड वॉक ऑफ फेम 2026 साठी (Hollywood Walk of Fame) निवड करण्यात आली आहे. 2026 च्या मोशन पिक्चर (Motion Picture) कॅटेगरीमध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेम क्लासमध्ये सन्मानित होणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. बुधवारी लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) ओव्हेशन हॉलिवूड येथे पत्रकार परिषदेत या सन्मानाची घोषणा करण्यात आली. दीपिका पदुकोणने 2017 मध्ये हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दीपिकासोबत या कलाकारांची नावे देखील यादीत

हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सने बुधवारी ही यादी जाहीर केली. दीपिका पदुकोणच्या नावासोबतच या यादीत हॉलिवूड अभिनेत्री एमिली ब्लंट, फ्रेंच अभिनेत्री कोटिलार्ड, कॅनेडियन अभिनेत्री राहेल मॅकअ‍ॅडम्स, इटालियन अभिनेता फ्रँको नीरो आणि सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅमसे यांची नावे समाविष्ट आहेत. हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सच्या वॉक ऑफ फेम निवड पॅनेलने 20 जून रोजी शेकडो नावांमधून 35 नावे निवडली. त्यानंतर, 25 जून रोजी, चेंबरच्या संचालक मंडळाने या यादीला मान्यता दिली.

तर दुसरीकडे दीपिका पदुकोण ही बऱ्याच काळापासून ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री मानली जात आहे. 2018 मध्ये दीपिकाचे नाव टाईम मॅगझिनच्या 100 सर्वात प्रभावशाली सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

ड्रग तस्करीत हात असणारे पोलिस होणार बडतर्फ; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

दीपिका पदुकोणने 2017 मध्ये हॉलिवूडमध्ये पदार्पण  

दीपिकाने 2017 मध्ये हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने 2017 मध्ये ‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात दीपिकासोबत विन डिझेल, नीना डोब्रेव्ह, डोनी येन, रुबी रोज आणि सॅम्युअल एल. जॅक्सनसारखे कलाकार दिसले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube