Download App

The Elephant Whisperers : सोशल मीडियावर होतीये ‘या’ फोटोची तुफान चर्चा

कार्तिकी गोंसाल्वेसने दिग्दर्शित केलेल्या द एलिफेंट व्हिस्पर्स या डॉक्यूमेंट्रीने ऑस्कर जिंकून संपूर्ण जगात भारताचे नाव केले आहे. ही फक्त निर्मात्यांनीसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या डॉक्यूमेंट्रीचा दिग्दर्शक अमेरिकेहून परत आला आहे. यानंतर त्याने या फिल्ममधील कलाकार बोमन व बेली यांचा ऑस्कर ट्रॉफी हातात घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कार्तिकी गोंसाल्वेस हा नुकताच तामिळनाडूमध्ये आला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर डॉक्यूमेंट्रीच्या मुख्य कलाकरांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते कलाकार अत्यंत आनंदी दिसत आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन देखील दिले आहे. आम्हाला वेगळे होऊन चार महिने झाले आहेत, आता मला असे वाटत आहे की मी घरी आहे, असे कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे.

 

 

GUMRAAH : गुमराह सिनेमाचा ट्रेलर रिलीज; आदित्य-मृणाल पहिल्यांदाच एकत्र

या फोटोला सोशल मीडियावर चागंलीच पसंती मिळत आहे. एकाने लिहले आहे की, आम्ही बोमन व बेलीचे मोठे फॅन झाले आहोत. यानंतर एक जण म्हणाला की, आम्हाला आता बोमन व अलीच्या सोबत ऑस्करचा फोटो पाहिजे.

सेन्सॉर बोर्डानं बंदी घातलेले ‘ते’ चित्रपट ओटीटीवर बिनधास्त पाहा; वाचा संपूर्ण लिस्ट

या डॉक्यूमेंट्रीमध्ये व्याघ्र प्रकल्पातील एलिफंट कॅम्पचे दृश्य दाखवण्यात आले आहे. यात बोमन आणि बेली हे हत्तीशी बोलतात. ही फिल्म पाहून परदेशातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत की माणूस एखाद्या प्राण्याशी कसा बोलू शकतो. या डॉक्यूमेंट्रीमध्ये भारताची जुनी परंपरा दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये मानव आणि प्राणी यांचे जवळचे नाते दाखवण्यात आले आहे. पडद्यावरील माणसाचे आणि प्राण्याचे भावनिक नाते पाहून अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी येते आहे.

Tags

follow us