सेन्सॉर बोर्डानं बंदी घातलेले ‘ते’ चित्रपट ओटीटीवर बिनधास्त पाहा; वाचा संपूर्ण लिस्ट

सेन्सॉर बोर्डानं बंदी घातलेले ‘ते’ चित्रपट ओटीटीवर बिनधास्त पाहा; वाचा संपूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (Central Board of Film Certification)म्हणजेच सीबीएफसी एक सरकारी मान्यताप्राप्त संस्था आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Information and Broadcasting)या संस्थेचं काम चालतं. ही संस्था देशातील सिनेमांना (Movies)प्रमाणपत्र देण्याचं काम करत असते. 90 च्या दशकात किंवा 2000 च्या सुरुवातीच्या काळात धर्म(Religion), निषिद्ध विषय किंवा लैंगिकता (sexuality)यांच्याशी संबंधित चित्रपटांना त्यावेळी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने (CBFC) तात्काळ बंदी घातली होती. काही चित्रपटांवर काही काळासाठी तर काही चित्रपटांना कायमची बंदी घालण्यात आली होती. पुढं बदलत्या काळानुसार सेन्सॉर बोर्ड (Censor Board)ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मध्येही बदल झाले आहेत. तसं पाहिलं तर आता कमी चित्रपटांवर बंदी घातली जाते.

IND vs AUS 3rd ODI टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण समोर; या सामन्यांमध्ये ‘ही’ गोष्ट ठरली महत्वाची

चित्रपटांमध्ये काय दाखवावं आणि काय दाखवू नये हा एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्या अशा चित्रपटांबद्दल माहिती सांगणार आहोत की, ज्यांच्यावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. अशा काही चित्रपटांना बंदी घातल्यानंतरही त्यांची खूप चर्चा झाली होती. आता आपण ते चित्रपट नेमके कोणत्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पाहता येतील हे पाहूया.

1 चित्रपट : परजानिया
स्टार कास्ट : नसीरुद्दीन शाह, कोरिन नेमेक, सारिका
प्रदर्शन तारीख : 26 जानेवारी 2007
प्लॅटफॉर्म : डिस्ने प्लस हॉटस्टार

2 चित्रपट : किस्सा कुर्सी का
स्टार कास्ट : शबाना आझमी, राज बब्बर, चमन बग्गा
प्रदर्शन तारीख : 16 फेब्रुवारी 1978
प्लॅटफॉर्म : यूट्यूब

3 चित्रपट : ब्लॅक फ्रायडे
स्टार कास्ट : केके मेनन, आदित्य श्रीवास्तव, पवन कुमार, इम्तियाज अली, नवाजुद्दीन सिद्दीकी, विजय मौर्य
दिग्दर्शक : अनुराग कश्यप
प्लॅटफॉर्म : डिस्ने प्लस हॉटस्टार

4 चित्रपट : वॉटर
स्टार कास्ट : लिसा रे, जॉन अब्राहम, सीमा बिस्वास
प्रदर्शन तारीख : 9 मार्च 2007
प्लॅटफॉर्म : यूट्यूब

5 चित्रपट : एंग्री इंडियन गॉडेस
स्टार कास्ट : सारा-जेन डायस, राजश्री देशपांडे, संध्या मृदुल
प्रदर्शन तारीख : 4 डिसेंबर 2015
प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स

6 चित्रपट : लोइव
स्टार कास्ट : ध्रुव गणेश, सिद्धार्थ मेनन, शिव पंडित
प्रदर्शन तारीख : 1 मे 2017
प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स

7 चित्रपट : इंशाअल्लाह, फुटबॉल
प्रदर्शन तारीख : 10 ऑक्टोबर 2010
प्लॅटफॉर्म: यूट्यूब

8 चित्रपट : अनफ्रीडम
स्टार कास्ट : व्हिक्टर बॅनर्जी, आदिल हुसैन, भानू उदय
प्रदर्शन तारीख : 29 मे 2015
प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स

9 चित्रपट : फायर
स्टार कास्ट : शबाना आझमी, नंदिता दास, करिश्मा झालानी
प्रदर्शन तारीख : 13 नोव्हेंबर 1998
प्लॅटफॉर्म : यूट्यूब

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube