‘क्रांतिज्योती’ची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट! पहिल्याच वीकेंडला 3.91 कोटींची बंपर कमाई

मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ने पहिल्याच वीकेंडला जमवला तब्बल 3.91 कोटींचा गल्ला.

Untitled Design   2026 01 05T134614.544

Untitled Design 2026 01 05T134614.544

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Medium’ created a sensation at the box office : मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर(Social Media) व बुक माय शोवर चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला तब्बल 3.91 कोटींचा गल्ला जमवला आहे. जोरदार कमाई करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर(Box Office) धुमाकूळ घालत आहे.

पहिल्याच दिवसापासून अनेक शहरांमध्ये चित्रपट हाऊसफुल जात असून, मराठी शाळेच्या आठवणींमध्ये रमलेले प्रेक्षक भावुक होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहेत. चित्रपटातील आशय, संवाद, भावनिक क्षण आणि वास्तववादी मांडणी यामुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे.

चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव ठरत आहे. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळत असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. प्रेक्षकांकडून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राज्यभरातून त्यांना कौतुकाचे मेसेजेस आणि शुभेच्छा मिळत आहेत. अनेक प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर थेट दिग्दर्शकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, हीच या कलाकृतीच्या यशाची खरी पावती ठरत आहे.

अकोल्यामध्ये एमआयएमच्या सभेत मोठा राडा; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, ओवेसींनी घेतला काढता पाय

या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे. आमच्या प्रत्येक चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे, मात्र यावेळी विषय वेगळा होता. एक संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मांडला व त्यांनी तो मनापासून स्वीकारला, याचे खूप समाधान वाटते. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद मला पुढेही अधिक प्रामाणिक आणि त्यांच्या आवडीचे चित्रपट घेऊन येण्याची प्रेरणा देतो. मी सर्व रसिकप्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला असून यात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Exit mobile version