Adinath Kothare’s film “System” : टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी तिन्ही प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे ! वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तो हिंदी पासून मराठी विश्वात तितकच सातत्य टिकवून अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होताना दिसतोय.
ॲमेझॉन प्राईमच्या ” सिस्टम” मध्ये त्याने साकारलेली आलोक ही भूमिका आणि त्याची फिल्मी गोष्ट त्याने सोशल मीडिया वर शेयर केली असून एखादी गोष्ट मनापासून मॅनिफेस्ट केली ती आपल्या नशिबात येते याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव आदिनाथने शेयर केला आहे. सिस्टम मध्ये त्याने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून तो सध्या बॉलिवूड मधल्या अनेक बड्या स्टार्स सोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम करताना दिसतोय.
हैद्राबादमध्ये पोलिसांना गाडी का फोडावी लागली? माधापूर रेसिंग प्रकरणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल
“सिस्टम” चित्रपटाचा अनुभव शेयर करताना आदिनाथ सांगतो “मी एका बॉलिवुड अवॉर्ड फंक्शनला गेलो असताना माझी भेट दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्या सोबत झाली आणि मी त्यांना मला तुमच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे असं सहज बोलून गेलो आणि अगदी दुसऱ्याच दिवशी मला कास्टिंगसाठी फोन आला, माझं सिस्टम साठी ऑडिशन झालं आणि मी या चित्रपटाचा भाग सुद्धा झालो ! कधीतरी आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी या पूर्ण होतात आणि तसंच माझं हे एक स्वप्न पूर्ण झालं”
सिस्टममध्ये आदिनाथ ने “आलोक” ही भूमिका साकारली असून दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या सोबत स्क्रीन शेयर केली आहे. आगामी काळात आदिनाथ बॉलिवूड मधल्या अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स चा भाग होणार असून रामायण, गांधी मध्ये सुद्धा तो दिसणार असल्याचं कळतंय.
