बिग बॉस मराठीनंतर आलेल पहिल काम आणि फर्स्ट इव्हर अल्बम साँग म्हणून खास आहे – तन्वी कोलते !

सारेगम मराठीच्या “ चाकरी” या गाण्यात तन्वी एका नव्या रुपात दिसत असून हे गाण तिच्यासाठी खूप खास देखील असल्याचं कळतंय.

Untitled Design (11)

Untitled Design (11)

The first project after Bigg Boss Marathi : अभिनय, फॅशन आणि बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री तन्वी कोलते ही नव्या रुपात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सारेगम मराठीच्या “ चाकरी” या गाण्यात तन्वी एका नव्या रुपात दिसत असून हे गाण तिच्यासाठी खूप खास देखील असल्याचं कळतंय. बिग बॉस मराठीनंतर तन्वीचा हा पहिला प्रोजेक्ट आहे आणि तिने तिच्या अभिनय कारकिर्दीत केलेलं हे पहिल वहिल अल्बम साँग आहे. नेहमीच ग्लॅमरस दिसणारी तन्वी या गाण्यात थोडी वेगळी हटके लूक मध्ये बघायला मिळतेय. तरुण वयातला गावरान लूक सोबतीला उतार वयात असलेली तन्वी या लूक मधून सगळ्यांच लक्ष वेधून घेते आहे.

“चाकरी” हे सारेगम मराठीच नवीन रोमँटिक नृत्यप्रधान मराठी नॉन-फिल्म गाण असून जे प्रेमाच्या सुंदर बाजू दाखवत आहे. तन्वीने या गाण्यासाठी पहिल्यांदा व्हायरल क्रिएटर प्रणित काळोखे सोबत अभिनय देखील केला आहे. “चाकरी” या म्युझिक व्हिडिओमध्ये एका जोडप्याच्या आयुष्यातील दोन टप्पे उलगडले जात असून तरुण प्रेमातील निरागसता आणि उत्साह तसेच त्यांच्या पुढील आयुष्यातील ऊब, सहवास आणि एकमेकांप्रती असलेली अढळ निष्ठा तन्वी आणि प्रणित यांनी उत्तम प्रकारे यातून उलगडून दाखवली आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजातील “चाकरी” हे गाण नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस येईल यात शंका नाही !

‘सरकारला सद्बुद्धी दे’ तुळजाभवानीच्या साक्षीने जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल; प्रमाणपत्रे रद्द करत असल्याचा आरोप

तन्वी तिच्या पहिल्या वहिल्या अल्बम गाण्याबद्दल बोलताना सांगते “बिग बॉस मराठी जिंकल्या नंतर हे माझं पहिल काम आहे चाकरी गाण करण हे माझ्यासाठी देखील खूप खास होत आज हे गाण प्रदर्शित होतंय सगळ्या रसिक प्रेक्षकांना ते नक्की आवडेल आणि हे गाण सोशलमीडियावर नक्कीच ट्रेंड होईल यात शंका नाही. सारेगम सोबत काम करण्याचा पहिला अनुभव देखील तितकाच सुंदर होता कारण मला त्यांचासोबत काम करण्याची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली आहे. चाकरी मधले दोन्ही लूक छान आहे म्हातारपण गाण्यात साकारणं थोडं अवघड वाटतं असलं तरी दोन्ही लूक उत्तमप्रकारे घडून आले अस मला वाटतं गाण्यात चाकरी करणारा हिरो आहे असाच खऱ्या आयुष्यात देखील चाकरी करणारा लवकर कोणी तरी सापडेल अशी आशा देखील आहे”

ग्लॅरमस जगातली तन्वी चाकरी मध्ये देखील तितकीच सुंदर आहे यात शंका नाही …..

Exit mobile version