The Kerala Story box office collection : ‘द केरळ स्टोरी’ (‘The Kerala Story’) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारने एकत्रितपणे चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सर्व वादानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटांच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अर्धशतक पूर्ण केले आहे.
सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि अदा शर्मा (Adah Sharma) अभिनीत द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मे ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन आता सहा दिवस झाले आहेत. या सहा दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली आहे. चित्रपटाचे कलेक्शन आकडे पाहता येत्या विकेंडला हा चित्रपटा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा विश्वास सर्वांना आहे. निश्चितच या चित्रपटाच्या यशाचं श्रेय हे त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जात आहे.
केरल स्टोरील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. त्यामुळंचे सहाव्या दिवशीही चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे.
#TheKeralaStory is UNBEATABLE and UNSTOPPABLE… Continues its DREAM RUN on weekdays… Fri 8.03 cr, Sat 11.22 cr, Sun 16.40 cr, Mon 10.07 cr, Tue 11.14 cr, Wed 12 cr. Total: ₹ 68.86 cr. #India biz. BLOCKBUSTER. #Boxoffice
Growth / Decline on *weekdays*…
⭐️ Mon: [growth] 25.40%… pic.twitter.com/vVkAocb4iY— taran adarsh (@taran_adarsh) May 11, 2023
द केरळ स्टोरीने पहिल्या बुधवारी म्हणजे, रिलीजच्या 6 दिवशी देखील बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाने बुधवारी चांगलीच उडी घेतली. आणि जवळपास 12 कोटींची कमाई केली आहे. मंगळवारपेक्षा त्यात 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.
द केरळ स्टोरी ने पहिल्या दिवशी 8.3 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी 11.22 कोटी आणि रविवारी या चित्रपटाने सर्वांधिक म्हणजे 16.10 कोटींची व्यवसाय केला.
सोमवारच्या कमाईचे आकडे पाहिले असता या चित्रपटाने 10.7 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर मंगळवारी या चित्रपटाची कमाई 11 कोटींच्या जवळपास होती. बुधवारी या चित्रपटाने 12 कोटींची कमाई केली आहे.
Maharashtra Political Crises : सगळं चुकलं पण सरकार वाचलं; सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं
एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतांनाच दुसरीकडे निर्मात्यांनी द केरळ स्टोरीला अन्य देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.