Download App

The Kerala Storyच्या दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “महिलांचे धर्मांतर…”

The Kerala Story: सुदीप्तो सेनचा ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये केरळमधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर (Women Conversion ) करून दहशतवादी (terrorist) कारवायांमध्ये सहभागी केल्याचे दाखविण्यात आले आहे. या सिनेमावरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=udoCRDjqxv8&t=33s

सिनेमाच्या कथेचे काही लोक समर्थन करत आहेत, तर काही लोक या सिनेमाला विरोध करत आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Directed by Sudipto Sen), निर्माता विपुल अमृतलाल शाह आणि अदा शर्मा आदीजण उपस्थित होते. प्रदर्शनानंतर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सिनेमाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. सिनेमाचे निर्माते सुदिप्तो सेन यांनी सांगितले आहे.

सिनेमात असे दाखविण्यात आले आहे की, सुमारे ३२ हजार महिलांनी अगोदर इस्लाम स्वीकारला आणि नंतर त्यांना सीरियाला हलविण्यात आले आहे. मात्र ३२ हजार या आकड्याने काही फरक पडत नाही. एका मुलीविषयी जरी असे घडले असेल तर कथा बाहेर यायला हवी, असे सुदिप्तो सेन म्हणाले होते. सुदिप्तो सेन पुढे म्हणाले की ३२ हजार संख्या ही अंदाजे आकडेवारी आहे.

Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी म्हणाले होते की, २०१४ मध्ये ९०० मुलींच्या धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर २०१५ आणि १६ या वर्षात कोणताही आकडा समोर आला नाही. यामुळे जुनी आणि त्यानंतरची आकडेवारी ही जोडण्यात आली आहे. तर दुसरीकडे केरळमधील लोकांचे म्हणणे आहे की, हा आकडा ५० हजारांहून जास्त असलयाचे सांगितले जात आहे.

Hardik Joshi Post: राणादाने पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर, अन् म्हणाला ‘माझ्या आयुष्यात…’

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर अनेक जण या सिनेमाला ‘प्रोपगंडा सिनेमा’ म्हणत असल्याचे सांगितले जात आहे.

या सिनेमावर होणाऱ्या या टीकेमुळे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला ३२ हजार महिलांचा आकडा बदलण्यात आला आहे. ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. आणि तसेच याबरोबरच सेन्सॉर बोर्डाने या सिनेमामध्ये १० बदल करण्यास सांगितले होते. अदा शर्मा या चाहत्यांना सिनेमात प्रमुख भूमिका साकारत असताना दिसणार आहे.

Tags

follow us