Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय
TDM Movie Director Bhaurao Karhade screening : ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान सिनेमाना प्रेक्षकांसमोर आणत आपली अनोखी ओळख निर्माण कऱणारा दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा (TDM Movie) सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या सिनेमाचे वेड लागले होते.
२८ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झालेल्या टीडीएम या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या सिनेमाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्याने प्रेक्षकांची निराशा झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रिन उपलब्ध नसल्याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊने सांगितले आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक भाऊने फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्यामध्ये त्यांनी आगामी काळात आपण टीडीएचे शो मागे घेत असल्याचे सांगितले आहे. मेकर्सच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटरमध्ये बघायची खूप इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन सध्या थांबवत आहे.
View this post on Instagram
यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर जाहीर करणार आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार! अशा शब्दांत दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. टीडीएमला स्क्रिन न मिळाल्याने कलाकारांनी गेल्या काही दिवसाअगोदर सिनेमागृहामध्ये रडत आपले गाऱ्हाणे मांडले होते.
यामध्ये कलाकारांनी मराठी सिनेमावर कशाप्रकारे अन्याय होत आहे. हे प्रेक्षकांना आणि चाहत्यांना सांगितले होते. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील टीडीएमला पुरेशा स्क्रिन्स देण्यात याव्यात. असे ट्विट केले होते.