Download App

Sudipto Sen: द केरळ स्टोरीनंतर सुदिप्तो सेन यांनी ‘या’ नव्या सिनेमाची केली घोषणा

  • Written By: Last Updated:

Sudipto Sen: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरी देखील या सगळ्या वादाचा सिनेमाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले आहे. आता या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला मिळालेला प्रतिसाद बघून दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी त्यांच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा केली आहे.

तसेच दिग्दर्शक सुदीप्तो सेन आता निर्माते संदीप सिंग यांच्यासोबत काम करणार आहेत. शनिवारी ट्विटरवर सुदीप्तो सेन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. तसेच हातात २५ हजार कोटींचा धनादेश धरलेल्या माणसाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यांचा आगामी सिनेमा ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या जीवनावर आधारित असणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय १० जून रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. यानिमित्ताने बायोपिकची घोषणा करण्यात आली. तसेच सुदीप्तो सेन यांनी सांगितले आहे की, निर्माते संदीप सिंग, डॉ. जयंतीलाल गडा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या नव्या सिनेमाचे नाव देखील ‘सहाराश्री’ असणार आहे. २०१२ मध्ये इंडिया टुडेने सुब्रत रॉय यांना वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून घोषित केले होते.

भारतात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकात देखील करण्यात आला आहे. या सिनेमात त्यांच्या संघर्षापासून ते देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनण्याचा त्यांचा प्रवास दाखवला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच ‘सहाराश्री’ सिनेमाचे गीतकार गुलजार, तर संगीताची जबाबदारी ए.आर.रहेमान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सध्या सुब्रत रॉय यांची भूमिका कोण साकारणार याबाबत निर्मात्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

तसेच या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सशी बोलणी सुरू असल्याची माहिती दिली आहे. या सिनेमाची निर्मिती पेन स्टुडिओचे निर्माते संदीप सिंग आणि डॉ.जयंतीलाल गडा करणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, कोलकाता आणि लंडन येथे त्याचे विस्तृत चित्रीकरण केले जाईल. ‘सहाराश्री’ हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us