‘केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा लवकरच चढणार बोहल्यावर? अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story Movie) सिनेमामुळे एका रात्रीमध्ये स्टार झाली. तिच्या अभिनयाचं कायम सर्वत्र कौतुक होत असल्याचे बघायला मिळाले होते. सध्या अदा सोशल मीडियावर (Social media) प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या मराठी कविता, तिचे अॅक्शन सीन्स, किंवा तिची मजामस्ती प्रेक्षकांना बघायला खूपच आवडते. अदा लग्न कधी करणार? […]

'केरळा स्टोरी' फेम अदा शर्मा लवकरच चढणार बोहल्यावर? अभिनेत्रींच्या 'ती' पोस्ट व्हायरल

'केरळा स्टोरी' फेम अदा शर्मा लवकरच चढणार बोहल्यावर? अभिनेत्रींच्या 'ती' पोस्ट व्हायरल

Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story Movie) सिनेमामुळे एका रात्रीमध्ये स्टार झाली. तिच्या अभिनयाचं कायम सर्वत्र कौतुक होत असल्याचे बघायला मिळाले होते. सध्या अदा सोशल मीडियावर (Social media) प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या मराठी कविता, तिचे अॅक्शन सीन्स, किंवा तिची मजामस्ती प्रेक्षकांना बघायला खूपच आवडते. अदा लग्न कधी करणार? या चर्चा कायम होत असतात. आता अदाच्या ‘त्या’ पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.


सध्या अदा शर्मा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. केरळ स्टोरीचे निर्माते विपुल शाह यांच्याच आगामी ‘बस्तर’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता अदाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती जॅकी चॅनचे अॅक्शन डायरेक्टर एंडी लॉन्गसोबत गन शूटिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला तिने ‘अदा का स्वयंवर’ असं कॅप्शन दिल्याने तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

परंतु पुढे तिने योग्य बंदूक निवडत असल्याचे देखील लिहिलं आहे. म्हणजेच काय तर ती योग्य जोडीदार नाही, तर सध्यातरी तिच्या शूटसाठी योग्य गनच्या शोधामध्ये असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. अदा शर्माने 1920 या बॉलिवूड सिनेमात काम केले होते. अदा शर्माने फक्त बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमात देखील काम केले आहे. ‘1920 ‘ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिने अनोख्या भूमिका साकारल्या ज्या चाहत्यांना खूपच आवडल्या. या सिंमेटही अदाच्या फर्स्ट लूकने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

Dunki चं पहिलं गाणं रिलीज; शाहरूखच्या रोमॅंटीक अंदाजाने चाहत्यांना भूरळ

दरम्यान अदा शर्माच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट फक्त १५ ते २० कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती.

Exit mobile version