Adah Sharma: आगामी थ्रिलर ‘द गेम ऑफ गिरगीट’मध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसणार अदा शर्मा!

Adah Sharma: आगामी थ्रिलर ‘द गेम ऑफ गिरगीट’मध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसणार अदा शर्मा!

गेल्या अनेक वर्षांपासून अदा शर्मा (Adah Sharma) ही हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या द केरळा स्टोरी या सिनेमानं अदाला एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आणलं आहे. विविध कारणांमुळे हा सिनेमा सध्या खूपच गाजत आहे. दरम्यान, आता द केरळ स्टोरी’च्या (The Kerala Story) यशावर उंच भरारी घेत, अदा शर्मा तिच्या पुढच्या सिनेमाची घोषणा करण्यासाठी तयार झाली आहे, गंधार फिल्म्स आणि स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘द गेम ऑफ गिरगीट’ (The Game of Girgit) या सिनेमामध्ये अदा शर्माबरोबर श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हा सिनेमा अलीकडच्या काळात तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या प्रसिद्ध ‘ब्लू व्हेल गेम’वर आधारित आहे. जगभरातील तरुण वर्गाला सतत या गेमकडे आकर्षित केले गेले आणि हा चर्चेचा एक प्रमुख मुद्दा बनला, कारण या गेमशी संबंधित ‘द ब्लू व्हेल’ चॅलेंजमुळे विविध धोकादायक घटना आणि मृत्यू घडले.

याशिवाय निर्मात्यांनी गुरुवारी ‘द गेम ऑफ गिरगिट’ चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये सर्व कलाकार अतिशय दमदार अवतारात दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पांड्या यांनी केले आहे.

पोस्टर पाहा :

तिच्या भूमिकेबद्दल बोलताना अदा शर्मा म्हणते, “द गेम ऑफ गिरगीटमध्ये मी भोपाळमधील एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ब्लू व्हेल अॅप नावाच्या अॅपवर आधारित आहे. एखाद्याने असाइनमेंट घेतल्यावर दुसर्‍याला हानी पोहोचवणे किंवा इजा करणे यातून मार्ग नाही. या चित्रपटात मी केस सोडवत आहे. मी यापूर्वी कमांडोमध्ये एका पोलिसाची भूमिका केली आहे. त्यावेळी साकारलेली भावना रेड्डी खूप लोकप्रिय झाली आहे. पण, सध्या साकारत असलेली गायत्री भार्गव ही पोलीस व्यक्तीरेखा खूप वेगळी आहे”

Supreme Court Hearing on ShivSena : घटनापीठासमोर असलेले 9 प्रश्न; यावरच येणार निकाल?

या चित्रपटाविषयी बोलताना नायक श्रेयस तळपदे म्हणाला, “चित्रपटाचे कथानक अत्यंत मनोरंजक आहे आणि त्यामुळेच मी या चित्रपटाशी जोडल्या गेलो आहे. ‘गेम ऑफ गिरगीट’चे दिग्दर्शन विशाल पांड्या करत आहेत आणि मी या सिनेमाची वाट पाहत आहे. या थ्रिलर चित्रपटामध्ये मध्ये एक शक्तिशाली संदेश आहे जो प्रेक्षकांपर्यंत, विशेषत: देशातील लहान मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे असे आम्हाला वाटते.

विशाल पांड्या दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा अत्यंत अपारंपरिक भूमिकेत दिसणार आहे. ज्यात ती चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ नंतर, अदा शर्मा ‘द गेम ऑफ गिरगीट’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये एक मजबूत कथा देखील आहे आणि ती सत्य घटनांनी प्रेरित आहे. त्याबद्दल बोलताना विशाल म्हणतो, “गिरगिटचा गेम ही आजच्या पिढीची कथा आहे, जिथे लहान मुलांनी मोबाईलवर फ्रेंडशिप अॅप्स त्यांच्या मित्रांच्या रूपात स्वीकारले आहेत. ज्यांच्याशी ते त्यांचे सर्व खाजगी आयुष्य शेअर करतात. श्रेयस तळपदे एका अॅप डेव्हलपरची भूमिका करतो, जो या असुरक्षित मुलांचा फायदा घेतो आणि अदा ही पोलिस आहे, मुलांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांची चौकशी करते”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube