वयाच्या 16 वर्षी गरोदर स्थितीत आशा भोसलेंना पतीने घराबाहेर काढलं, थरकाप उडवणारी काहाणी

एका मुलाखतीत आशा ताईंनी सांगितलं होतं की गणपतरावांच्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारलं नाही.

News Photo   2026 04 12T140936.826

वयाच्या 16 वर्षी गरोदर स्थिती आशा भोसलेंना पतीने घराबाहेर काढलं, थरकाप उडवणारी काहाणी

भारतीय संगीत विश्वातील एक युगांत (Bhosale) घडवणारा, चैतन्यमय आणि सर्वांना भुरळ घालणारा आवाज आज कायमचा शांत झाला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत निधन झालं. वयाच्या ९२ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले या गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण. त्यांचे वडील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडीत दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा सगळ्या भावंडांनी पुढे चालवला. दरम्यान, आशा भोसले यांच्या लग्नाची कहाणी ऐकून अंगावर काटा येईल असा प्रकार घडला होता. काय आहे त्याची कहाणी पाहूयात.

६० आणि ७० च्या दशकात लता मंगेशकर खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचं सर्व काम पाहणारे लता दीदींनी एक सचिव नियुक्त केला होता. गणपतराव भोसले हे त्यांचे सचिव होते. आशा ताई गणपतरावांच्या प्रेमात पडल्या पण कुटुंबियांनी या लग्नाला कडाडून विरोध केला. दोघांनीही घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आशा भोसले या फक्त १६ वर्षांच्या होत्या, तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. दोघांनीही आपल्या पसंतीने लग्न केलं होतं पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.

मोठी बातमी! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

एका मुलाखतीत आशा ताईंनी सांगितलं होतं की गणपतरावांच्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारलं नाही. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर गणपतरावांनी आशा भोसले यांना एक दिवस घराबाहेर हाकलून दिलं. त्यावेळी त्या गरोदर होत्या. सासरच्या घरातून हाकलून दिल्यानंतर त्या आपल्या हेमंत आणि वर्षा या दोन मुलांसह माहेरी परतल्या. दरम्यान, तिसरी मंझिल चित्रपटादरम्यान आरडी बर्मन यांनी आशा भोसले यांना गाण्यासाठी संपर्क साधला.

आशा ताईंसारखाच पंचम दा यांचाही तेव्हा घटस्फोट झाला होता. पंचम दा त्यांची पहिली पत्नी रीता पटेलपासून वेगळे झाले होते. रिटा पटेल यांच्यावर ते इतके नाराज होते की, घर सोडून हॉटेलमध्ये राहायला गेले होते. आशा भोसले यांनी पंचम दा यांच्या सिनेमांसाठी अनेक गाणी गायली. पंचमचं संगीत आणि आशा यांचा मधुर आवाज ऐकून ते दोघं एकमेकांसाठी आहेत असं वाटायचं. पंचम यांनी १९८० मध्ये आशा भोसलेंशी लग्न केलं. पंचम आणि आशा यांच्या या संगीतमय प्रेमकथेचा प्रवास फार काळ टीकू शकला नाही आणि लग्नाच्या १४ वर्षानंतर पंचम दा वयाच्या ५४ व्या वर्षी आशा भोसले यांना एकटे सोडून हे जग सोडून गेले.

Exit mobile version