Download App

Women’s Day : शाकुंतलमच्या निर्मात्यांनी दिल्या महिला दिनाच्या अनोख्या शुभेच्छा !

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. शाकुंतलम असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट शकुंतला या महाकाव्यामधील महिले भोवती फिरणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने महिला दिन सादर करण्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये समांथाचं शकुंतलाच्या लूकमधील पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘महिला दिनानिमित्त शाकुंतलम या चित्रपटाच्या टीमने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्यांनी लिहिले की, स्त्रीत्वाचं सार साजरं करू. सर्व महान महिलांना टीम शाकुंतलमकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !’ शाकुंतलम या चित्रपटाबाद्दल सांगायचे झाले तर या चित्रपटामध्ये अभिनेत्री समांथा शकुंतलाची भूमिका साकारणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच शाकुंतलम चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. काही दिवसांपुर्वी निर्मात्यांकडून ही माहिती देण्यात आली होती की, ‘आम्हाला वाईट वाटतय की, आम्ही शाकुंतलम चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज करू शकणार नाही. तर लवकरच आम्ही चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करू’. त्यानंतर आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट आता 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Samantha Ruth Prabhu : शाकुंतलम चित्रपटाची डेट रिलीज ठरली, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आतापर्यंत या चित्रपटातील तीन गाणे रिलीज झाले आहेत. ‘येलेलो येलेलो’, ‘मल्लिक मल्लिक’, ‘ऋषीमुनीयों का’ असे या गाण्याचे नावं आहेत. टीप्स ऑफिशिअल या युट्यूब चॅनलवरून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या अगोदर या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणे रिलीज झाले होते. तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मिडीयावर ट्रेंड करत होता. हा ट्रेलर तेलुगूशिवाय हिंदीमध्ये देखील रिलीज करण्यात आला. 2 मिनिट 52 सेकंडच्या या शकुंतलमच्या ट्रेलरने पुन्हा एकदा सामंथा देशभर आणि जगभर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे.

Tags

follow us