Download App

प्रतीक्षा संपली; ‘गूगल आई’चा रहस्यमय टिझर प्रदर्शित, या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'गूगल आई' हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Google Aai Marathi Movie : तंत्रज्ञानावर आधारित ‘गूगल आई’ हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली होती. (Marathi Movie) त्यातच आता ही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक जबरदस्त टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Google Aai) टीझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असं सुखी कुटुंब दिसत आहे.

मोठी बातमी : लडाखमध्ये लष्करी सरावादरम्यान भीषण अपघात, JOC सह 5 जवान शहीद

या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जातं. आता नेमकं काय घडलं आहे आणि यातून ‘गूगल आई’ या कुटुंबाला कसं बाहेर काढतं, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. दरम्यान, हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट असून यात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, एका लहान मुलीची ही कथा आहे जी संकटात अडकलेल्या आपल्या कुटुंबाला ‘गूगल आई’ कसं बाहेर काढते. आता हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडलं आहे आणि त्यांची सुटका कशी होणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक; वाचा, काय आहे कारण

तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केलं असून डॉलर्स दिवाकर रेड्डी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अतिशय रोमांचक असा हा टिझर रहस्यांनी भरलेला आहे.

 

follow us

वेब स्टोरीज