‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज…

'तरुण तुर्क म्हातारे अर्क' हे नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर. शुभारंभाचा प्रयोग मंगळवार 30 डिसेंबर ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार.

Untitled Design   2025 12 27T101158.361

Untitled Design 2025 12 27T101158.361

The play ‘Tarun Turk Mhatare Ark’ is once again on stage : ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवार 30 डिसेंबर रोजी दुपारी ठाणे(Thane) येथील गडकरी रंगायतनमध्ये(Gadkari Rangayatan) होत आहे. या नाटकात अतुल तोडणकर, अभिजीत चव्हाण व नीता पेंडसे हे आजच्या आघाडीचे कलावंत प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासह चिंतन लांबे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, निलेश देशपांडे, श्रुती पाटील हे कलाकारही या नाटकात विविध भूमिका रंगवत आहेत. प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर व विजया राणे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

उत्तरेतील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

अनामिका व कौटुंबिक कट्टा निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित, नव्या संचात रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाचे 30 डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन, 31 डिसेंबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह व 1 जानेवारी 2026 रोजी श्री शिवाजी मंदिरात शुभारंभाचे प्रयोग सादर होणार आहेत. राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून, नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. या नाटकाला तुषार देवल यांनी पार्श्वसंगीत दिले असून, प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. मंगल केंकरे यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. अशोक मुळ्ये व दिनू पेडणेकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.

Exit mobile version