Download App

संजय जाधव दिग्दर्शित ‘कलावती’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत

  • Written By: Last Updated:

मराठी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून संजय जाधव (Sanjay Jadhav) यांची ओळख आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिका यांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. २००८ साली त्यांनी चेकमेट या चित्रपटाची धुरा सांभाळली. या चित्रपटांनंतर रिंगा रिंगा, फक्त लढ म्हणा, दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरु, येरे पेरे पैसे, खारी बिस्कीट, तमाशा live, तु ही रे, असे असे कितीतरी दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. संजय जाधव यांनी आजवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. लवकरच त्यांचा ‘दुनियादारी २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, केके फिल्म लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि ब्लॅक रोज फिल्म यांनी एका चित्रपटाची घोषणा केली. ‘कलावती’ (‘Kalawati’) असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत.

२६ फेब्रुवारी रोजी सिनेमाचा मुहूर्त संगीतकार गायक अवधूत गुप्तेच्या उपस्थितीत पार पडला. अभिनेत्री अमृता खानविलकरची मुख्य भूमिका या सिनेमात पाहायला मिळेल. पडद्यामागे अर्धवट झाकलेला अमृताचा चेहरा असणारं सिनेमाचं पोस्टर यावेळी लाँच करण्यात आलं. या पोस्टरमध्ये अमृताचा चेहेरा पूर्णपणे दिसला नसला तरी तिची करारी नजर आणि एकूणच चित्रपटाचा बाज या पोस्टरमधून समजला आहे. अजूनतरी या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आली नाही.

अमृताने काही दिवसांपूर्वीच चंद्रमुखी या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. चंद्रा गाण्याच्या माध्यमातून तिने अनेकांना आपल्या तालावर नाचवलं होतं. अमृताने चंद्रमुखी हे प्रमुख पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. तिच्या अदांनी सगळेच घायाळ झाले होते. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कांदबरीवरील आधारित चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतील उतरला. दरम्यान, आता ‘कलावती’ या सिनेमात झळकणार आहे.

संजय जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तब्बल ४ वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून संजय जाधव हॉरर कॉमेडी प्रकार हाताळणार आहेत. संजय जाधव दिग्दर्शित ‘कलावती’ सिनेमाची निर्मिती प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांची आहे. तर कथा निशिकांत भुसे आणि अनुजा कर्निक यांची आहे.

ज्येष्ठ पटकथा लेखक जयंत धर्माधिकारी काळाच्या पडद्याआड 

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अमृता खानविलकरसह संजय नार्वेकर, तेजस्वनी लोणारी, हरीश दुधाडे, दिप्ती धोत्रे, संजय सेजवाल, नील सालेकर हे कलाकार दिसणार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने देखील या चित्रपटात झळकणार आहे. अद्याप चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही.

Tags

follow us