रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; ‘आफ्टर ओ.एल.सी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यांत निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी दिग्गज आहेत.

News Photo   2025 11 18T170907.224

News Photo 2025 11 18T170907.224

दुनियेच्या आड दडलेलं एक गूढ लवकरच उलगडणार, होय. (Movie) आफ्टर ओ.एल.सी चित्रपटाचा ट्रेलर पाहून असंच वाटू लागलंय. बरेच दिवसांपासून चर्चेत असलेल्या आफ्टर ओ.एल.सी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. अगदी थाटामाटात ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा चित्रपटातील कलाकार आणि इतर टीमच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपटाचा ट्रेलर सुरू होताच वातावरणात एक अज्ञात तणाव पसरतो.

मैत्री, विश्वासघात, आणि लपलेल्या रहस्यांच्या या गुंत्यातून बाहेर पडताना हा चित्रपट कोणतं रहस्य मागे सोडणार याची उत्कंठा वाढवणारा आणि रहस्यमय थराराने, एक्शन पॅक्ड सीन्सने भरलेला हा सिनेमा आहे असं ट्रेलरवरून स्पष्ट होतंय. कलाकारांचा दमदार अभिनय, दिग्दर्शकाचे उत्तम दिग्दर्शन, शूट करण्यात डीओपीने कसलीही न सोडलेली कमतरता, जबरदस्त आणि रोमँटिक टच असलेल्या संगीताची जादू या सगळ्या गोष्टींनी ट्रेलरमधूनच चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.

Film Bazaar 2025 साठी मुक्काम पोस्ट देवाचे घर आणि श्री गणेशा या मराठी चित्रपटांची निवड

हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यांत निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत. आणि प्रेक्षकांसाठी हा संगम पर्वणीच म्हणायला हवी. ट्रेलरनंतर येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र दिग्दर्शित ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटात अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. ही कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे.

ट्रेलरमधील सीन पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागांत शूट झाल्याचं स्पष्ट दिसतंय. ट्रेलरमधील लक्षणीय बाब म्हणजे संगीत. ‘आफ्टर ओ.एल.सी’मध्ये मराठी गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहित राऊत, आनंदी जोशी, आर्या आंबेकर, अभय जोधपुरकर यांनी पार्श्वगायनाची धुरा सांभाळली आहे.

कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत निर्मिती केली आहे. येत्या २८ नोव्हेंबरला ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version