मुंबई : टॉलिवूडमधील ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमध्ये नामांकने मिळाली आहेत.
यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्विकारला. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर एम एम कीरावानी यांनी भावना व्यक्त केल्या.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे. अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर वॉक देखील केला.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.