Download App

Golden Globe Awards: ‘नाटू नाटू’ गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार

मुंबई : गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards) सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ‘आरआरआर’ (RRR movie) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत.

यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्विकारला. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर एम एम कीरावानी यांनी भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, ‘हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे. माझी पत्नी यावेळी उपस्थित आहे. हा पुरस्कार आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आहे. त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला तसेच त्यांनी मला सपोर्ट केला, याबद्दल मी त्याचे आभार मानतो.’ यावेळी आरआरआर चित्रपटाच्या टीमनं टाळ्यांचा कडकडाट केला.

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे. अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर वॉक देखील केला.

आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Tags

follow us