Download App

दुबईत शाहरुखची हवा; ‘पठाण’चा ट्रेलर झळकणार बुर्ज खलिफावर

  • Written By: Last Updated:

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पठाण’चा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे.

किंग खान सध्या ‘पठाण’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने ‘इंटरनॅशनल लीग टी 20’साठी दुबईच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार आहे.

‘पठाण’ या बहुचर्चित सिनेमाच्या ट्रेलरचं आज जगातील सर्वात उंच इमारतीवर बुर्ज खलिफावर स्क्रीनिंग होणार आहे. यशराज फिल्म्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘पठाण’ या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालणार आहे.

शाहरुखचे चाहते ‘पठाण’ या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.

या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Tags

follow us