आशाताईंच्या अंत्यसंस्कारानंतर 90 मिनिटातंच भावाची मोठी घोषणा, नावं बदललं

16 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या उपस्थितीत नवीन हॉस्पिटलच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

News Photo   2026 04 13T215227.782

आशाताईंच्या अंत्यसंस्कारानंतर 90 मिनिटातंच भावाची मोठी घोषणा, नावं बदललं

भारतीयांच्या मनावर गेली 7 दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अन् आपल्या सुमधूर गायनानं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला आहे. आशा भोसलेंवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकरांनी 90 मिनिटातचं मोठी घोषणा केली आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी पुण्यात ही घोषणा केली आहे.

सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

रविवारी 12 एप्रिलला वयाच्या 93 व्या वर्षी आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आज लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेते तसंच सेलिब्रिटी उपस्थित होते.

बहिणीसाठी काय घोषणा केली?

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, 16 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या उपस्थितीत नवीन हॉस्पिटलच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या हॉस्पिटलला आम्ही लता दीदींचे नाव देणार होतो, मात्र आता आशा दीदींचे निधन झाल्याने त्यांच्या नावाचा समावेश हॉस्पिटलच्या नावात करण्यात येणार आहे. पुण्याजवळील नांदोशी इथं होणाऱ्या नवीन हॉस्पिटलला लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असे असणार आहे.

हॉस्पिटलच्या उद्घटनाला आशाताई येणार होत्या. वडिलांच्या नावावर एक रुग्णालय तर आहेच. आता दीदींबरोबर आणि ताईंच्या स्मरणार्थ हे रुग्णालय असणार आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय असणार आहे. हे हॉस्पिटल 40 एकरांमधे असेल. वेगवेगळे विभाग असतील. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा असणार आहे. या वेळी संकल्प आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. या वेळी पांढरे कपडे घालून येण्याचे आवाहन हृदयनाथ मंगेशकर यांनी केले आहे.

Exit mobile version