Download App

Third Eye Asian Film Festival मध्ये सिनेरसिकांसाठी मेजवानी; ‘या’ दिवशी होणार सुरूवात

Third Eye Asian Film Festival : अशिया खंडातील चित्रपटांसाठी एक मोठं व्यासपीठ म्हणजे <strong>थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव. (Third Eye Asian Film Festival) हा महोत्सव एशियन फिल्म फाऊंडेशन यांच्याकडून आयोजित केला जातो. यावर्षीचा हा 20 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव असणार आहे. 2002 सालापासून या चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे.

राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडं मागणी

महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा हा चित्रपट महोत्सव 12 जानेवारी ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट सिनेमा, माहिम आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जातील.

Inter Cast Marriage Couple : लव्ह मॅरेज करणाऱ्यांचं टेन्शन मिटलं! सरकारचा मोठा निर्णय…

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या 20 व्या आवृत्तीत, आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील बारा चित्रपटांचा समावेश आहे. इराणमधील सात चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रोज स्वप्न पडतात अन् सकाळ उठून…’ संदिपान भुमरेंचा टोला

भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, मराठी भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. यात फॅमिली, डीप फ्रीझ, बिजया पोरे, या गोष्टीला नावच नाही, आत्मपॅम्पलेट, हाऊस ऑफ कार्डस, एपिसोड १३, सेयुज सनधन, आरोह एक प्रितिभी, मिनी, विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर, गोराई पाखरी या 12 चित्रपटांचा समावेश आहे.

मराठी स्पर्धा विभागात स्थळ (दिग्द. जयंत सोमाळकर), रघुवीर (दिग्द . निलेश कुंजीर), महाराष्ट्र शाहीर, (दिग्द. केदार शिंदे), स ला ते स ला ना ते (दिग्द. संतोष कोल्हे), जित्राब (दिग्द. तानाजी गाडगे), गिरकी (दिग्द. कविता दातीर, अमित सोनावणे), गाभ (दिग्द. अनुप जत्राटकर), टेरिटरी (दिग्द. सचिन श्रीराम), मदार (दिग्द. मंगेश बदार) या 9 चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग असणार आहे. कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच मान्यवर ज्युरी सदस्यां बरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी 5 जानेवारीपासून सुरू होत असून www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवरूनही नोंदणी करता येईल.

follow us