मुंबई : बॉलिवूड (Bollywood)क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील त्यांच्या घरी नेलं जाणार आहे. त्यानंतर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
असा होता अभिनेते सतीश कौशिक यांचा जीवन प्रवास…
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 ला हरियाणातील महेंद्रगड येथे झाला होता. अनेक वर्ष ते दिल्लीमध्ये देखील राहत होते. 1972 ला त्यांनी कीरोडीमल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पुर्ण केलं.त्यानंतर नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा आणि एफटीआयआयमध्ये त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. 1983 साली त्यांचं जाने भी दो यारो या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पम झालं. त्यांच्या परिवाराबद्दल सांगायचं झालं तर 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिक यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलं होते. पण त्यांचा मुलगा शानुचं 1996 ला निधन झालं. त्यानंतर 2012 मध्ये त्यांना सरोगसीतून वंशिका मुलगी झाली.
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन
सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये जाने भी दो यारो, जमाई राजा, साजन चले ससुराल, चल मेरे भाई, हमारा दिल आपके पास है, ब्रिक लेन, उडता पंजाब, मिस्टर इंडिया, मिस्टर अॅंड मिसेस खिलाडी, यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती. मिस्टर इंडियामुळे त्यामध्ये त्यांनी कॅलेंडर ही भूमिका साकारली होती. तसेच दिवाना मस्तानामध्ये त्यांनी पप्पू हा भूमिका साकारली होती. मिस्टर अॅंड मिसेस खिलाडीमध्ये त्यांनी चंदा मामा हा भूमिका साकारली होती.साजन चले ससुरालमध्ये त्यांनी मुत्थू स्वामी ही भूमिका साकारली होती. त्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या ह्रदयावर राज्य केलं.
सतीश कौशिक यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. परदेशी बाबूमधील कॉमिक रोलसाठी बॉलिवूड अॅवार्ड, कागजमधील सहाय्यक अभिनेत्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार, साजन चले ससुराल आणि राम लखनसाठी त्यांना दोन फिल्मफेअर मिळाले होते. थारसाठी ओटीटी प्ले अवॉर्डही मिळाला होता.
अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शन, निर्माती, पटकथा लेखनदेखील केलं ‘रूप की रानी चोरों का राजा’ आणि प्रेम हे त्यांच्या दिग्दर्शनात बनलेले चित्रपट होते. हे चित्रपट मात्र फ्लॉप झाले. पण त्यानंतर तेरे नाम, हम आपके दिल में रहते है ने मात्र त्यांना यश दिलं.