रिडली स्कॉट यांच्या ‘द डॉग स्टार्स’चा थरारक अंतिम ट्रेलर प्रदर्शित; 28ऑगस्टला भारतात प्रदर्शित होणार चित्रपट

जगाचा विनाश झाल्यानंतरच्या भयावह आणि संघर्षमय वातावरणात आशेचा शोध घेणारी ही थरारक कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाणार आहे.

Untitled Design (29)

Untitled Design (29)

Thrilling final trailer of ‘The Dog Stars’ released : हॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक रिडली स्कॉट यांच्या बहुप्रतीक्षित ‘द डॉग स्टार्स’ या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जगाचा विनाश झाल्यानंतरच्या भयावह आणि संघर्षमय वातावरणात आशेचा शोध घेणारी ही थरारक कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाणार आहे. हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लेखक पीटर हेलर यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘द डॉग स्टार्स’ मध्ये जेकब एलॉर्डी, जोश ब्रोलिन, मार्गारेट क्वॉली, अ‍ॅलिसन जेनी, बेनेडिक्ट वाँग आणि गाय पिअर्स यांसारख्या नामवंत कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची पटकथा मार्क एल. स्मिथ यांनी लिहिली असून निर्मिती रिडली स्कॉट, मायकेल प्रुस, मार्क एल. स्मिथ आणि क्लिफ रॉबर्ट्स यांनी केली आहे.

31 दिवस तुरुंगात राहिला म्हणून लोकप्रतिनिधी दोषी ठरत नाही; सुप्रिया सुळेंचा सुमोटो प्रस्तावाला विरोध

चित्रपटाची कथा हिग (जेकब एलॉर्डी) या तरुण वैमानिकाभोवती फिरते. एका भयानक आपत्तीनंतर उद्ध्वस्त झालेल्या जगात हिग आणि बंगले (जोश ब्रोलिन) हा सैनिकी पार्श्वभूमीचा जिवंत राहण्याच्या कौशल्यात पारंगत असलेला व्यक्ती मिळून एका एकाकी ठिकाणी आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. कठोर आणि निर्दयी परिस्थितीत जगत असतानाच हिगला एका रहस्यमय रेडिओ संदेशाचा आवाज ऐकू येतो. हा संदेश त्याच्या आयुष्याला नवे वळण देतो आणि तो आशा, मानवता आणि नव्या जीवनाच्या शोधासाठी अज्ञात दिशेकडे निघतो.

रिडली स्कॉट यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘द डॉग स्टार्स’ हा केवळ जगण्याची लढाई दाखवणारा चित्रपट नाही, तर तो माणुसकी, दुःख, जिद्द आणि आशेची शक्ती यांचा भावनिक वेध घेणारा अनुभव आहे. उद्ध्वस्त झालेल्या जगातही आशेचा किरण शोधण्याचा प्रयत्न करणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी ठरणार आहे. २०थ सेंच्युरी स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘द डॉग स्टार्स’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version